
गोव्यात (Goa) भाजप १५ जागांवर, काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहे, तृणमूल काँग्रेस (TMC) ६ जागांवर आघाडीवर आहे.आपलं मुख्यमंत्रिपद कायम राखण्यात डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांना यश मिळतं, (Goa Assembly Election Results 2022) का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
पणजी : देशातील सगळ्या छोटे राज्य असलेल्या गोव्यातील ४० जागांचा निकाल जाहीर (Goa Assembly Election Result 2022) होत आहे. भाजप या राज्यात आघाडीवर आहे. काँग्रेस मागे पडली आहे. तृणमुल काँग्रेसचे उमेदवार ५ जागांवर आघाडीवर (TMC) आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत(Pramod Sawant) सांक्लिममध्ये आणि पणजीमध्ये भाजपचे अतानासियो मोनसेराटे आघाडीवर आहे.
गोव्यात भाजप १५ जागांवर, काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहे, तृणमूल काँग्रेस ५ जागांवर आघाडीवर आहे.
आपलं मुख्यमंत्रिपद कायम राखण्यात डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांना यश मिळतं, का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. डॉ. प्रमोद सावंत यांनी मतमोजणीआधी आपल्या साखळी मतदारसंघात सपत्नीक दत्त मंदिरात जाऊन प्रार्थना केली. यावेळी प्रमोद सावंत यांनी भाजपं बहुमतानं जिंकून येत आहे, असा विश्वास व्यक्त केला. डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपनं गोव्यात निवडणुका लढवल्या आहेत. आता मतमोजणीत सुरुवातीच्या कलांनुसार डॉ. प्रमोद सावंत हे आघाडीवर असल्याचं दिसून आलं होतं.
मतमोजणीनंतर उमेदवारांची बैठक सायंकाळी चार वाजता पणजीतील भाजप मुख्यालयात होणार असल्याची माहिती मिळाली आहे.