utpal parrikar

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांना पराभवाचा धक्का बसला आहे.  अपक्ष उमेदवार उत्पल पर्रिकर यांचा पणजी मतदारसंघातून ८०० मतांनी पराभव झाला आहे. (Utpal Parrikar Losses Goa Election 2022) भाजपचे बाबुश मोन्सरात विजयी झाले आहेत.

    पणजी: सध्याच्या घडीला गोव्यामध्ये (Goa) काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. (Goa Assembly Election Results 2022) ४० जागांच्या विधानसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी २२ जागा आवश्यक आहेत. परंतु, सध्या काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष आळीपाळीने आघाडी घेताना दिसत आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांना पराभवाचा धक्का बसला आहे.  अपक्ष उमेदवार उत्पल पर्रिकर यांचा पणजी मतदारसंघातून ८०० मतांनी पराभव झाला आहे. भाजपचे अतानिसोयो मोन्सरात उर्फ बाबुश मोन्सरात विजयी झाले आहेत. (Utpal Parrikar Losses Goa Election 2022)

    सध्याच्या आकडेवारीनुसार काँग्रेस १६ जागांवर आघाडीवर आहे.भाजप १६ जागांवर आघाडीवर आहे, तृणमूल काँग्रेस ४ जागांवर आघाडीवर आहे. आप एका जागेवर आघाडीवर आहे. इतर पक्ष ३ जागांवर आघाडीवर आहेत.