
यूपीचे निकाल हे पुरावे आहेत की भाजपला विशेषतः महिलांचा आशीर्वाद मिळाला आहे. एक स्त्री असणे ही माझ्यासाठी नक्कीच आनंदाची बाब आहे. यूपीची ही निवडणूक भाजपाने विकास आणि विकासाच्या मुद्द्यांवर लढवली. आज केवळ भाजपाच नव्हे तर विकासाचा विजय होत आहे, असे स्मृती इराणी यांनी सांगितले.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊ लागले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपाचे सरकार येणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ या दोघांना दिले आहे.
“आपल्या सर्वांसाठी परिवाराचे प्रमुख नरेंद्र मोदीजी आहेत. या बाबतीत योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदी यांच्यात मतभेद ठेवणार नाही. उत्तर प्रदेशात यशस्वी नेतृत्व देणाऱ्या योगीजींच्या सरकारचाच चमत्कार आहे की आज पुन्हा भाजपाचे सरकार स्थापन होत आहे.” व्होट बँकेच्या राजकारणातून बाहेर पडून विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करा, असे नरेंद्र मोदी यांनी जनतेला सांगितले होते. त्यामुळेच आज मी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला श्रेय देते, असे स्मृती इराणी म्हणाल्या. याचबरोबर, यूपीचे निकाल हे पुरावे आहेत की भाजपला विशेषतः महिलांचा आशीर्वाद मिळाला आहे. एक स्त्री असणे ही माझ्यासाठी नक्कीच आनंदाची बाब आहे. यूपीची ही निवडणूक भाजपाने विकास आणि विकासाच्या मुद्द्यांवर लढवली. आज केवळ भाजपाच नव्हे तर विकासाचा विजय होत आहे, असे स्मृती इराणी यांनी सांगितले.