Yogi Adityanath captions picture with PM Modi in Lucknow

उत्तर प्रदेशात 2017 व आता 2022 मध्ये भाजपाची पूर्ण बहुमताने सत्ता स्थापन होणार आहे. यापूर्वी 1980, 1985 मध्ये पूर्ण बहुमताची पुनरावृत्ती झाली होती. 1980 मध्ये 309 आणि 1985 मध्ये काँग्रेसने 269 जागांसह सत्ता मिळविली होती. हा विक्रम आता भाजपाने तब्बल 37 वर्षानंतर मोडित काढला आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ यांचे नावही पक्के समजले जात आहे( The BJP broke the 37-year record - Will form a majority government for the second time).

    उत्तर प्रदेशात 2017 व आता 2022 मध्ये भाजपाची पूर्ण बहुमताने सत्ता स्थापन होणार आहे. यापूर्वी 1980, 1985 मध्ये पूर्ण बहुमताची पुनरावृत्ती झाली होती. 1980 मध्ये 309 आणि 1985 मध्ये काँग्रेसने 269 जागांसह सत्ता मिळविली होती. हा विक्रम आता भाजपाने तब्बल 37 वर्षानंतर मोडित काढला आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ यांचे नावही पक्के समजले जात आहे( The BJP broke the 37-year record – Will form a majority government for the second time).

    मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी आदित्यनाथ इतिहास रचणार असून त्यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंदही होणार आहे. सरकार स्थापन होताच पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्तेवर येण्याचा विक्रम योगी नोंदवतील. असा प्रकार राज्यात कधीच आजवर घडलेला नव्हता.

    उत्तर प्रदेशमध्ये अनेक मुख्यमंत्री पुन्हा सत्तेत आले आहेत, पण त्यापैकी एकानेही पहिल्या 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही. यामध्ये संपूर्णानंद, चंद्र भानू गुप्ता आणि हेमवती नंदन बहुगुणा यांच्या नावांचा समावेश आहे.