उत्तरप्रदेशाच्या निकालाचे रहस्य १० प्रश्नांच्या उत्तरात! मायावतींची मते कशी पडली भाजपाच्या पारड्यात

देशातील पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल आता हाती आले आहेत. लक्षवेधी ठरली आहे ती उत्तर प्रदेशची निवडणुक. उत्तर प्रदेशात भाजप आघाडीवर आहे. योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. समाजवादी (Samajwadi Party) पक्षाचे प्रमुख अखिलेश (Akhilesh Yadav) यादव यावेळीही सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत. यूपीमधील निवडणूक निकालांच्या ट्रेंडमध्ये भाजप बहुमताच्या खूप पुढे दिसत आहे.

  लखनौ :  देशातील पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल आता हाती आले आहेत. लक्षवेधी ठरली आहे ती उत्तर प्रदेशची निवडणुक. उत्तर प्रदेशात भाजप आघाडीवर आहे. योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. समाजवादी (Samajwadi Party) पक्षाचे प्रमुख अखिलेश (Akhilesh Yadav) यादव यावेळीही सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत. यूपीमधील निवडणूक निकालांच्या ट्रेंडमध्ये भाजप बहुमताच्या खूप पुढे दिसत आहे.

  १. भाजपाच्या मोठ्या विजयाचे कारण काय
  उत्तर – बहुजन समाज पार्टीची भाजपाला मिळालेली साथ. बसपाने १२२ जागी असे उमेदवार उभे केले होते, जे सपाच्या उमेदवाराच्या जातीचेच होते. यात ९१ मुस्लिम बहुल तर ५१ यादवबहुल जागा होत्या. या जागा अशा होत्या, जिथे सपाच्या विजयाची सर्वाधिक शक्यता होती. या १२२ जागांपैकी ६४ जागी भाजपाचे उमेदवार पुढे आहेत. विजय-पराभवाचे अंतर इथे कमी असण्याची शक्यता आहे

  २. सपाची सर्वात मोठी चूक कोणती
  उत्तर- मुस्लीमांचे लांगूलचालन करणारी पार्टी अशी प्रतिमा निर्माण करणे, ही चूक होती. बाहुबली मुख्य्तार अन्सारी यांच्या मुलाने ज्या पद्धतीने हिंदू अधिकाऱ्यांना धमकावले, त्याने अधिकारी किती घाबरले माहित नाही. पण हिंदू मतदार सपापासून दूर झाले.

  ३. भाजपा हिंदू मतांच्या ध्रुवीकरणात सफल झाली का
  उत्तर-हो, मोदी-योगी प्रत्येक बाबीत हिंदुत्व जोडत होते. याची सुरुवात अमित शाह यांनी कैरानापासून केली होती. त्यानंतर अखेरच्या टप्प्यात मोदी तीन दिवस काशीत मुक्कामी होते. यातून मोदी-शाहा हे हिंदूचिंतक आहेत अशी प्रतिमा निर्माण झाली. त्यामुळेच मुस्लिमांची मते न मिळूनही भाजपाच्या मतांची टक्केवारी ४२ टक्क्यांच्या घरात आहे. गेल्यावेळी हे प्रमाण होते ३९ टक्के. बसपाचा वोट शेअर आहे १२.७ टक्के, गेल्यावेळी तो होता २२.९ टक्के. याचाच अर्थ असा की मायावतीच्या पक्षातील हिंदू दलित मोठ्या प्रमाणात भाजपाकडे सरकले.

  ४. राममंदिर आणि काशी विश्वेशराच्या मंदिर विकासामुळे भाजपा जिंकली का
  उत्तर- काही प्रमाणात हो. या दोन्ही जागी अखेरच्या फेरीपर्यंत चुरशीची लढत झाली. मात्र ही दोन्ही मंडिरे हिंदुत्वाचा चेहरा तयार करण्यासाठी उपयोगी ठरली. दोन्ही ठिकाणी चुरशीची लढत झाली असली तरी हिंदुत्वासाठी मंदिरांचा उपयोग झाला.

  ६. जातीच्या आधारावर मतदान झाले नाही का
  उत्तर – जातीच्या आधारावर विभाजन झाले, पण त्याचे प्रमाण कमी होते. पश्चिम युपीत जाट शहरी आणि ग्रामीण भागात वाटले गेले. दलित वोट पहिल्यांदा बसपाकडून भाजपाकडे आली आहेत. सवर्णांतही मतभेद होते. भविष्याच्या राजकारणासाठी हा भाजपासाठी सकारात्मक मुद्दा आहे. सपाचा पारंपरिक यादवही घोषी आणि कामारिया या दोन भागांत वाटला गेला. याचा फायदा भाजपाला होताना दिसतोय.

  ७. मोदींची जादू किती चालली
  उत्तर- यावेळीही मोदींची जादू चालली. १९ प्रचार सभा करीत त्यांनी १९२ जागा कव्हर केल्या. यापैकी अधिक जागांवर भाजपा उमेदवार आघाडीवर आहेत.

  ८. योगींचा बुलडोझर किती कामाला आला
  उत्तर- योगींनी ७० ते ८० सभांत बुलडोझरचा उल्लेख केला. या सर्व जागी भाजपाला आघाडी मिळाली आहे. माफियांच्या विरोधात कारवाईचे चिन्ह म्हणून बुलडोझरला मान्यता मिळवून देण्यात योगींना यश आले. जनतेनी याकडे कायदा-सुव्यवसल्था सबलीकरणाच्या दृष्टीकोनातून पाहिले.

  ९. लाभार्थींचे मतदान किती उपयोगी ठरले
  उत्तर – विजय-पराभवात भाजपाचा स्रावधिक विश्वास हा लाभार्थींच्या मतदानावर होता. त्याचा आकडा होता १५ कोटी. यांना महिन्याला अन्नधान्य-तेल आणि मिठही देण्यात येत होते. मिठाचे कर्ज उतरवायचे आहे, हा संदेश देण्यात भआजपा यशस्वी ठरली. याचा भावनिक परिणाम झाला.

  १०. शेतकरी, मोकाट जनावरे, बेरोजगारी या मुद्द्यांचा किती परिणाम
  उत्तर- याचा थोडा परिणाम झाला पण भाजपाला जेवढी भीती होती तेवढा याचा परिणाम झाला नाही. पश्चिम युपीत ६० टक्के जागांवर भाजपाने आघाडी घेतलेली आहे. अमित शाहा यांच्या चाणक्य नीतीने या ठिकाणी हिंदू व्होटिंगचे ध्रुवीकरण करण्यात यश आले. ज्या लखीमपूरमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या मुलावर शेतकऱ्यांना चिरडण्याचा आरोप होता, तिथे ८ पैकी सात जागांवंर भाजपाने आघाडी घेतलेली आहे.

  ११. अखिलेश यांच्या सभांतील गर्दी काय भाड्याने आणलेली होती
  उत्तर- असे म्हणणे चुकीचे ठरेल. सध्याच्या आकड्यांवरुन सपाने जर १३२ जागा जिंकल्या तरी त्यांना ८४ टक्के लाभ होताना दिसतो आहे.