दुचाकी आणि एस.टी बसमध्ये भीषण अपघात, १ मृत्यू तर १ जण गंभीर जखमी

अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीररीत्या जखमी आहे. अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तातडीने घटनस्थळी धाव घेतली. अडकलेल्या तरुणांना बस मधून काढले व दोघांना रुग्णालयात हलविले दुपार पर्यंत दोन्ही तरुणाची ओळख पटली नव्हती.

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये बस आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक झाल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीला बसने पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. ही घटना शहरातील सिडको बस स्थानका जवळ घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त दोन्ही तरुण (एम.एच.२० व्ही.४४१२) या दुचाकीवरून जात होते. दरम्यान, जालना जाणारी बस क्रमांक (एम.एच.२० बीएल २९०७) याबससमोर आले व बस दुचाकीला पाठीमागून धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही तरुणासह दुचाकी अर्धी बसमध्ये घुसली होती.

या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीररीत्या जखमी आहे. अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तातडीने घटनस्थळी धाव घेतली. अडकलेल्या तरुणांना बस मधून काढले व दोघांना रुग्णालयात हलविले दुपार पर्यंत दोन्ही तरुणाची ओळख पटली नव्हती. प्रथमदर्शनी दोघेही परळी येथील असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून पोलीस तरुणाची ओळख पाठविण्याचे काम करीत आहेत.