४०० कोटीतून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाऐवजी १०० कोटींचे त्यांच्या नावाने ४ रुग्णालये उभारावे

आज महाराष्ट्र सरकारच्या बजेटवर खासदार इम्तियाज जलील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, औरंगाबाद येथील २०० बेडचा महिला व शिशु रुग्णालयाचा १११ कोटी रुपयाचा प्रकल्प आहे, तो गेल्या ७ वर्षापासुन रखडलेला होता, आता ते काम लवकरच सुरु होणार आहे.

    औरंगाबाद (Aurangabad).  आज महाराष्ट्र सरकारच्या बजेटवर खासदार इम्तियाज जलील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, औरंगाबाद येथील २०० बेडचा महिला व शिशु रुग्णालयाचा १११ कोटी रुपयाचा प्रकल्प आहे, तो गेल्या ७ वर्षापासुन रखडलेला होता, आता ते काम लवकरच सुरु होणार आहे.

    राज्य सरकार ४०० कोटी रुपये बाळासाहेब ठाकरे स्मारकाला देत आहेत. त्याच पैशातून जर १०० कोटी प्रमाणे राज्यातील चार विभागात सर्वसामान्य नागरीकांच्या वैद्यकिय सेवेसाठी व लोककल्याणासाठी एक-एक रुग्णालय सुरु केले जाऊ शकते आणि त्या रुग्णालयांना आपण बाळासाहेब ठाकरेंचे नाव दिले तरी चालेल यास काहीच हरकत राहणार नाही आणि कोणाचा विरोध ही असणार नाही. आपण सर्वांनी कोवीडच्या काळात बघितले होती की, आमच्या रुग्णालयांची अवस्था कशी आहे ? नागरीकांचे काय हाल झाले होते ? ४०० कोटीतुन स्मारकाऐवजी रुग्णालय बनविण्याबाबत महाराष्ट्र सरकारने सकारात्मक विचार करावा. मराठवाड्याच्या विकासासाठी सरकारने विशेष काही दिले नाही याची मी निंदा करतो.

    क्रीडा विद्यापीठ औरंगाबादला मंजुर झाले होते; पण औरंगाबादचे जे स्थानिक नेतेमंडळी आहे ते गप्प बसुन राहिले आणि विधानसभे मध्ये सुध्दा त्यांनी त्यांची बाजु योग्यरित्या मांडली नाही तसेच विरोध हि केला नाही म्हणून सदरील क्रिडा विद्यापीठ औरंगाबादहुन पुण्याला गेलेली आहे. मी औरंगाबाद जिल्ह्याचा खासदार या नात्याने मागणी करतो की, औरंगाबादला मंजुर झालेले क्रिडा विद्यापीठ औरंगाबादलाच देण्यात यावे.