प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

औरंगाबाद (Aurangabad) :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी, पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेत पहिल्या तीन दिवसात ६३ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे ऑनलाईन परीक्षा दिली आहे. सोमवार पासून अभियांत्रिकी विद्याशाखेच्या परीक्षाही सुरु झाल्या असून चार जिल्हयात परीक्षा सुरळीतपणे सुरु आहे.

  • चार जिल्हयात ३३० केंद्रांवर परीक्षा परीक्षेपासून वंचित
  • विद्यार्थ्यांची माहिती मागविली
  • एम.टेक, एमसीए, एमबीएचे निकाल जाहीर

औरंगाबाद (Aurangabad) :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी, पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेत पहिल्या तीन दिवसात ६३ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे ऑनलाईन परीक्षा दिली आहे. सोमवार पासून अभियांत्रिकी विद्याशाखेच्या परीक्षाही सुरु झाल्या असून चार जिल्हयात परीक्षा सुरळीतपणे सुरु आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा विभागाच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे. चार जिल्हयात ३३० वेंâद्र असून सकाळी ९ ते ३ व दुपारी २ ते ८ अशा या दोन टप्यात परीक्षा होत आहेत. पहिल्या दिवशी ११ हजार ६७ विद्याथ्र्यांनी तर दुस-या दिवशी २२ हजार १३९ विद्याथ्र्यांनी ऑनलाईन परीक्षा यशस्वीरित्या दिली. तर सोमवारी (दि.१२) दुपारी पाच वाजेपर्यंत २९ हजार ५४२ विद्याथ्र्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली आहे, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी दिली. यामध्ये अभियांत्रिकी विद्याशाखेतील अभियांत्रिकी, स्थापत्य विद्या व औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमाच्या परीक्षा सोमवार पासून सुरु झाली.

उर्वरित विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पध्दतीने परीक्षा दिली. ऑनलाईन परीक्षा देतांना काही तांत्रिक अडचण आली तर त्या विद्यार्थ्यांना जवळच्या केंद्रात जाऊन ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली. येत्या ३१ ऑक्टोबर पर्यंत ही परीक्षा पूर्ण होणार असून पहिल्या दिवशी ऑनलाईन देताना आलेल्या तांत्रिक अडचणीचा अपवाद वगळता उर्वरित दोन्ही दिवशी परीक्षा सुरळीत पार पडली. या सर्व केंद्रांवर कोविड च्या पार्श्वभूमीवर ‘फिजीकल डिस्टन्सिंग‘ ठेऊन परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वत्ते यांनी सोमवारी मौलाना आझाद महाविद्यालय व देवगिरी महाविद्यालयांच्या केंद्रांना भेट दिली. प्राचार्य डॉ.मझहर फारुकी, प्राचार्य डॉ.शिवाजी थोरे, उपप्राचार्य अनिल आर्दड यांनी माहिती दिली. अधिष्ठाता डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.चेतना सोनकांबळे, उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा, डॉ.दिगंबर नेटके यांनी विविध वेंâद्राना भेट देऊन परीक्षेचा आढाव घेतला.

एम.टेक, एमसीए, एमबीए चे निकाल जाहीर
दरम्यान, अंतिम सत्राला केवळ शोधप्रंबध असलेल्या एमसीए, एमबीए व एमटेक या अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे निकाल सोमवारी घोषित झाले. या परीक्षाचे १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान शोधप्रबंध दाखल करुन मौखिक परीक्षा घेण्यात आली.

परीक्षेपासून वंचित विद्यार्थ्यांची माहिती मागविली
दरम्यान, पदवी, पदव्यूत्तरच्या अभ्यासक्रमात ९, १० व १२ ऑक्टोबर रोजी जर कोणता विद्यार्थी तांत्रिक अडचणी मुळे ऑनलाईन परीक्षा देऊ शकला नसेल तर त्या विद्यार्थ्यांची माहिती परीक्षा विभाग जमा करत आहे. या विद्यार्थ्यांनी नेमक्या कोणत्या ऑनलाईन पेपर देता आला नाही या अभिप्रायसह परीक्षा मंडळ संचालकाच्या coeexamfeedback@gmail.com मेल आईडीवर माहिती पाठवावा, असे परीक्षा मंडळ संचालकांनी कळविले आहे.

विद्यापीठातील विभागाच्या परीक्षा बुधवारपासून
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा औरंगाबाद येथील मुख्य परिसर व उस्मानाबाद येथील उपपरिसर या ठिकाणच्या सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा या येत्या बुधवार पासून सुरु होत आहेत. ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पध्दतीने या परीक्षा होत असून काही अडचण आल्यास संबंधित विद्यार्थ्यांनी विभागाशी संपर्क साधावा, असे परीक्षा विभागा कडून कळविले आहे.