भर बैठकीत आमदार विनायक मेटे यांना शिवीगाळ; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

आमदार विनायक मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी दुपारी येथे आयोजित बैठकीत गोंधळ घालणाऱ्या नऊ जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अभिमन्यु माकणे (रा. पडेगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अंबादास म्हस्के, किसन घनवट, नवनाथ मुळे, सचिन घनवट, राहुल यलदी तसेच अन्य चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    औरंगाबाद : आमदार विनायक मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी दुपारी येथे आयोजित बैठकीत गोंधळ घालणाऱ्या नऊ जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अभिमन्यु माकणे (रा. पडेगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अंबादास म्हस्के, किसन घनवट, नवनाथ मुळे, सचिन घनवट, राहुल यलदी तसेच अन्य चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    माकणे यांच्या तक्रारीनुसार पडेगाव येथील ईश्वर हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर आमदार विनायक मेटे यांच्या उपस्थितीत शिवसंग्राम पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. राहुल यलदी व सचिन घनवट हे बैठकीतून बाहेर गेले व नंतर येताना सोबत पडेगाव येथील अंबादास म्हस्के, किसन घनवट, नवनाथ मुळे व इतर पाच जणांना आणले.

    बैठकस्थळी येताच म्हस्के याने आमदार मेटे यांना शिवीगाळ केली. तसेच, मेटे यांच्या आणि फिर्यादी माकणे यांच्या अंगावर घावून आला. तर घनवट, मुळे व इतरांनी टेबल ढकलून दिला. फिर्यादी व अन्य कार्यकर्त्यांनी या आरोपींची समजूत काढत बाहेर काढले. यात आरोपींपैकी कोणीतरी फिर्यादीच्या गळ्यातील एक लाख किमतीची सोन्याची चेनही लंपास केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.