कोविड केअर सेंटर येथे ५००० बेडची सुविधा निर्माण करण्यात येणार

होम आयसोलेशन ची सुविधा उपलब्ध कोरोना रुग्णांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने ज्या रुग्णांना सौम्य लक्षण आहेत अशा रुग्णांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली होम आयसोलेशनची मुभा त्यांना देण्यात येणार आहे अशी माहिती प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली. 

    औरंगाबाद:  महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्या कारणाने प्रशासनासमोर आव्हान उभे राहत आहे. याकरिता महानगरपालिका स्तरावर कोरोना रुग्णांसाठी नवीन ५००० बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. अशी माहिती प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.
    ‘माझी हेल्थ माझ्या हाती’  या मोबाईल ॲप चा जास्तीत जास्त वापर करावा. कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेता लोकांमध्ये जनजागृती व्हावी यादृष्टीने एम एच एम एच ह्या अँप द्वारे नागरिकांना मध्ये उपलब्ध बेड ची माहिती प्राप्त होणार आहे. या अँप चा जास्तीत जास्त वापर लोकांनी करावा असे आवाहन देखील प्रशासकांनी केले आहे. होम आयसोलेशन ची सुविधा उपलब्ध कोरोना रुग्णांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने ज्या रुग्णांना सौम्य लक्षण आहेत अशा रुग्णांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली होम आयसोलेशनची मुभा त्यांना देण्यात येणार आहे अशी माहिती प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.  याचबरोबर लोकांनी गर्दी टाळावी,मास्क वापरावा ,सोशल डिस्टन्सचे नियम पाळावेत असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.