कोरोनाची लस घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; आठ दिवसांपूर्वी घेतली होती कोरोना लस

कोरोनाची लस घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने औरंगाबादमध्ये खळबळ उडाली आहे. आठ दिवसांपूर्वी या पोलिस कर्मचाऱ्याने कोरोनाची लस घेतली होती.

    औरंगाबाद : कोरोनाची लस घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने औरंगाबादमध्ये खळबळ उडाली आहे. आठ दिवसांपूर्वी या पोलिस कर्मचाऱ्याने कोरोनाची लस घेतली होती.

    भास्कर शंकर मेटे असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मेटे हे बेगमपुरा पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत होते. हर्सूल पोलीस ठाण्यात त्यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    १३ फेब्रुवारी रोजी मेटे यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. मात्र, ड्युटीवर असताना अचानक त्यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी सिटी स्कॅन मध्ये त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आली. अखेर उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला.