A young woman who had lodged a rape complaint against NCP's Mehboob Sheikh has suddenly gone missing

महेबूब शेख यांच्यावर अटकेसह कठोर कारवाईच्या मागणीसाठी भाजपकडून राज्यभरात आंदोलनं करण्यात आली. आरोपीला अटक करत नाही तोवर पोलिसांनी घरी येऊ नये, असा पवित्राही तक्रारदार तरुणीने घेतला होता. यानंतर आता ही तरुणीच बेपत्ता झाल्याच्या चर्चेने खळबळ उडाली आहे. ही तरुणी नॉट रिचेबल असल्‍याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या संपूर्ण यंत्रणा या तरुणीचा शोध घेत आहे.

औरंगाबाद: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब इब्राहिम शेख यांच्याविरोधात औरंगाबादमध्ये महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. बीड मधील एका तरुणीने ही तक्रार केली आहे. या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

बीड मधील एका उच्चशिक्षीत तरुणीने शेख यांच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. महेबूब शेख यांनी नोकरी लावण्याच्या बहाण्याने ओखळ वाढवली. यानंतर मुंबईला जाण्याच्या नावाखाली कार मध्ये बलात्कार केल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटलेय.

दरम्यान, महेबूब शेख यांच्यावर अटकेसह कठोर कारवाईच्या मागणीसाठी भाजपकडून राज्यभरात आंदोलनं करण्यात आली. आरोपीला अटक करत नाही तोवर पोलिसांनी घरी येऊ नये, असा पवित्राही तक्रारदार तरुणीने घेतला होता.

यानंतर आता ही तरुणीच बेपत्ता झाल्याच्या चर्चेने खळबळ उडाली आहे. ही तरुणी नॉट रिचेबल असल्‍याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या संपूर्ण यंत्रणा या तरुणीचा शोध घेत आहे.

महेबूब इब्राहिम शेख यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच राजकीय हेतूने ही तक्रार दाखल केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली होती. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेबूब शेख यांच्याविषयी दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे स्पष्ट आहे. मी स्वतः त्याच्याशी बोललो आणि त्याने सदरच्या बातम्या धादान्त खोट्या आहेत असे सांगितले. माझा महेबूब शेख वर विश्वास आहे. असे ट्विट आव्हाड यांनी केले होते.