MP Sambhaji Raje criticizes Sharad Pawar and Mahavikasaghadi government

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यापासूनच समाजात असंतोष निर्माण झाला आहे. समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी छत्रपती संभाजीराजे राज्याच्या दौऱ्यावर असून बहुजन समाजाला जो न्याय मिळतो तोच मराठा समाजाला मिळावा, अशी मागणी करीत वेळप्रसंगी रस्त्यावरही उतरण्याचा इशारा त्यांनी दिला.

    औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यापासूनच समाजात असंतोष निर्माण झाला आहे. समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी छत्रपती संभाजीराजे राज्याच्या दौऱ्यावर असून बहुजन समाजाला जो न्याय मिळतो तोच मराठा समाजाला मिळावा, अशी मागणी करीत वेळप्रसंगी रस्त्यावरही उतरण्याचा इशारा त्यांनी दिला.

    या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अन्य विरोधी पक्षनेत्यांना भेटणार असून 28 तारखेला भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणासाठी कोणी राजीनामे द्यावे हे सांगू शकत नाही. मात्र माझा राजीनामा देऊन जर प्रश्न सुटत असेल तर मी नक्कीच राजीनामा देईन, याचा पुनरुच्चारही छत्रपतींनी केला.

    सरकारने दखल घेतली नाही तर रस्त्यावर उतरावे लागेल, पण ही आंदोलनाची वेळ नाही. 70 टक्के समाज गरीब आहे, त्यांच्यासाठी काय करणार हे सरकारनेच स्पष्ट करावे. तसेच मराठा समाजाच्या मुद्द्यांना राजकीय रंग देऊ नये असेही संभाजी राजे म्हणाले.

    सरकारी दरबारी विषय पोहोचवायचा असेल तर रस्त्यावर आंदोलने करावी लागतात. ५८ मोर्चे काढून हा विषय पोहचवला आहे, सरकारला सर्व गोष्टी माहिती आहे. हे काही खुळे सरकार नाही ना, म्हणूनच ते सरकार झाले आहे. पुन्हा एकदा लोकांना वेठीस धरणे या मताचा मी नाही.

    मी शिव शाहूंचा वंशज असून सामान्यांची काळजी करणे कर्तव्य आहे. करोना संकट असल्याने लोकांचा जीव धोक्यात घालू शकत नाही. आंदोलन करावे की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. सरकार कोणतीही दखल घेत नसेल तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करावेच लागेल अशी भुमिका खासदार छत्रपती संभाजीराजें यांनी मांडली आहे.