औरंगाबादेत आणखी २७ जणांना कोरोनाची लागण

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने होत आहे. आज ६ ऑगस्ट ( गुरूवार ) दुपारच्या सुमारास २७ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ४ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा १५ हजार ५६७ इतका झाला आहे. तसेच ११ हजार ५२१ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या ३ हजार ५३९ जणांवर उपचार सुरू आहेत. परंतु एकूण ५०७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. 

कोणत्या भागांत मिळाले कोरोनाबाधित रूग्ण – 

लक्ष्मी नगर, गारखेडा परिसर (१), प्रोझोन मॉलच्या मागे, चिकलठाणा (१), मनपा (१६), शंकुतला नगर, गादिया कॉलनी (१), गारखेडा परिसर (१), ब्ल्यू बेरी (२), वृंदावन कॉलनी (१), शमी कॉलनी (१), कोहिनूर कॉलनी (१),ग्रामीण (११), खंडाळा (१) आणि वडगाव कोल्हाटी (१) अशा अजून काही भागांत कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत.