aurangabad muncipal corporation

लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार औरंगाबाद महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील मयत, सेवानिवृत्त, स्वच्छा निवृत्त 70 कर्मचाऱ्यांपैकी 34 कर्मचाऱ्यांनी कागदपत्राची पूर्तता केल्याने निवड समितीने त्यांना सफाई कामगार म्हणून नोकरीत सामावून घेतले असून 36 कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्याने यांच्या नियुक्त्या प्रलंबित आहेत.

    औरंगाबाद : लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार औरंगाबाद महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील मयत, सेवानिवृत्त, स्वच्छा निवृत्त 70 कर्मचाऱ्यांपैकी 34 कर्मचाऱ्यांनी कागदपत्राची पूर्तता केल्याने निवड समितीने त्यांना सफाई कामगार म्हणून नोकरीत सामावून घेतले असून 36 कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्याने यांच्या नियुक्त्या प्रलंबित आहेत.

    लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगाराच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवड समितीची बैठक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 18 मार्च 20 21 रोजी निवड समितीची बैठक झाली .या बैठकीत 70 कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्यासाठी अर्ज आले त्या अर्जातील कागदपत्राची तपासणी करून नियुक्ती देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.

    70 कर्मचाऱ्यांपैकी 34 कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्याने त्यांना दिनांक 26 एप्रिल 2021 रोजी सफाई कामगार म्हणून नियुक्ती देण्यात आली. तर 36 सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांनी वारस प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने त्यांच्या नियुक्त्या प्रलंबित आहेत.

    या कर्मचारी निवड समितीमध्ये अध्यक्ष महानगरपालिका आयुक्त प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय , अतिरिक्त आयुक्त बी .बी. नेमाने ,विधी सल्लागार अपर्णा थेटे ,मुख्य लेखा अधिकारी डि .के .हिवाळे ,आस्थापना सहाय्यक उपायुक्त विक्रम दराडे यांचा समावेश आहे. अशी माहिती आस्थापना अधिकारी विक्रम दराडे यांनी दिली.