aurangabad fine for not wearing masks

औरंगाबाद(aurangabad) पालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पांडेय(astik kumar pandey) यांच्या निर्देशानुसार कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई(action on people not wearing mask) करण्यात आली.तसेच या सोबतच रस्त्यावर थुंकणे,रस्त्यावर कचरा टाकणे ,हॉस्पिटलचा बायोवेस्ट या साठी ही दंड(fine) आकारण्यात आला आहे .

औरंगाबाद: औरंगाबाद(aurangabad) पालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पांडेय(astik kumar pandey) यांच्या निर्देशानुसार कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई(actionon peoplenot wearing mask) करण्यात आली.तसेच या सोबतच रस्त्यावर थुंकणे,रस्त्यावर कचरा टाकणे ,हॉस्पिटलचा बायोवेस्ट या साठी ही दंड(fine) आकारण्यात आला आहे .

शनिवारी घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक मित्र पथक प्रमुख  जाधव यांच्या नेतृत्वात पथक कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर थुंकण्यासाठी एकूण ५६ नागरिकांकडून प्रतिव्यक्ती १०० रुपये प्रमाणे ५६०० रूपये दंड वसूल केला. विना मास्क फिरणाऱ्या एकूण ११४ व्यक्तींकडून ५०० रुपये दंड प्रमाणे ५७००० रुपये व रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या एकूण १० नागरिकांकडून प्रतिव्यक्ती १५० रुपये प्रमाणे १५०० रुपये दंड वसूल केला.

शहरातील डॉ उक्कडगावकर हॉस्पिटल यांनी त्यांच्याकडील बायोवेस्ट कचरा गाडीत टाकल्याबद्दल ५००० रु दंड वसूल करण्यात आला. तसेच जालना रोड व बाबा पेट्रोल पपं येथे २ प्लॅस्टिक सप्लायर यांच्याकडून प्रतिबंधित प्लॅस्टिकबद्दल १०००० रु दंड वसूल करण्यात आला .शहरातील विविध ठिकाणी भाजी विक्रेते ,फळ विक्रेते यांच्या कडून प्लॅस्टिक जप्त करून त्यांच्या वर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अशाप्रकारे एकूण रुपये ८६१०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच दुकानदारांकडे थर्मल गन व पल्स ऑक्सीमिटर याची तपासणीदेखील यावेळी करण्यात आली .

शहरातील भाजी विक्रेते ,फळ विक्रेते यांच्याकडे प्रतिबंधित प्लॅस्टिकबद्दल कारवाई करण्यात येत आहे .ही कारवाई अशाच प्रकारे सुरू राहणार आहे . नागरिकांनी मास्क लावूनच घराबाहेर पडावे ,रस्त्यावर थुंकू नये व रस्त्यावर कचरा टाकू नये असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात येत आहे .आजपर्यंत महानगरपालिकेतर्फे शहरात१ मे ते ३ ऑक्टोबरपर्यंत विना मास्क कारवाई दरम्यान ५८८४ नागरिकांकडून ५०० रु प्रमाणे २९५३१५० रु दंड वसूल करण्यात आला आहे,असे नागरी मित्र पथक प्रमुख यांनी कळविले आहे .