corona

राज्य सरकारने अटी-शर्थींच्या अधीन राहून हॉटेल व बार-रेस्टॉरंट्स सुरू करण्यासाठी परवागनी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद महापालिका प्रशासनाने शहरातील हॉटेल, बार, रेस्टॉरंटमधील कर्मचार्‍यांची (hotel ,bar and restaurant workers corona test)कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला असून कर्मचार्‍यांना ही चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

औरंगाबाद: राज्य सरकारने अटी-शर्थींच्या अधीन राहून हॉटेल व बार-रेस्टॉरंट्स सुरू करण्यासाठी परवागनी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद महापालिका प्रशासनाने शहरातील हॉटेल, बार, रेस्टॉरंटमधील कर्मचार्‍यांची (hotel ,bar and restaurant workers corona test)कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला असून कर्मचार्‍यांना ही चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. तीन दिवसांत चाचणी करून घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

महाराष्ट्र सरकारने ५ ऑक्टोबरपासून राज्यात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे औरंगाबाद पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी हॉटेल व रेस्टॉरंट चालकांनी स्वतःची आणि हॉटेल कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी येत्या तीन दिवसात करून घ्यावी, असे निर्देश दिले आहे. याबाबत हॉटेल्स आणि रेस्टॉरंट असोसिएशन यांना आयुक्त पांडेय यांनी एक पत्रदेखील पाठवले आहे.

हॉटेल कर्मचारी आणि सर्वसामान्यांचे आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. यापूर्वी, शंभर टक्के लॉकडाऊन संपल्यानंतर आयुक्तांनी व्यापारी व विक्रेत्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना संसर्गाची साखळी रोखण्यास त्यांचा हा निर्णय फलदायी ठरला होता. कारण, यानंतर अनेक व्यापारी व विक्रेते कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. वेळीच त्यांच्यावर उपचार झाल्याने कोरोनाचा वाढता संसर्ग कमी होण्यास निश्‍चितच मदत झाली आहे. त्यादृष्टीनेच हा निर्णय देखील योग्य ठरणार आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

शहरात दूध, भाजीपाला, फळ, मटण-चिकन, अंडी आणि किराणा दुकानदारांची कोरोना चाचणी करण्याच्या मोहिमेचा दुसरा टप्पा आक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात हाती घेण्यात येणार आहे, अशी माहितीही पालिका आयुक्त पांडेय यांनी यानिमित्ताने दिली. जुलै महिन्यात या सहा गटातील विक्रेत्यांची कोरोना चाचणी करण्याची सक्ती पालिकेने केली होती. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यास मदत झाली होती. या मोहिमेची दुसरी फेरी आक्टोबर अखेर हाती घेतली जाणार आहे.