निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाच्या रेस टू झिरो आंतरराष्ट्रीय मोहिमेत औरंगाबाद महानगरपालिकेचा सहभाग

निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाच्या रेस टू झिरो या आंतरराष्ट्रीय मोहिमेत औरंगाबाद महानगरपालिकेने सहभाग घेतला आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी या करारावर स्वाक्षरी केली असून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. मोहीम नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी वेगवेगळ्या अंगाने प्रत्येक क्षेत्रांत नियोजन करून टप्प्याटप्प्याने ही मोहीम यशस्वी पणे राबविण्यात येणार आहे .

  औरंगाबाद : निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाच्या रेस टू झिरो या आंतरराष्ट्रीय मोहिमेत औरंगाबाद महानगरपालिकेने सहभाग घेतला आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी या करारावर स्वाक्षरी केली असून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. मोहीम नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी वेगवेगळ्या अंगाने प्रत्येक क्षेत्रांत नियोजन करून टप्प्याटप्प्याने ही मोहीम यशस्वी पणे राबविण्यात येणार आहे.

  डिसेंबर २०१५मध्ये झालेल्या पॅरिस कराराचा भाग म्हणून जवळपास २०० देशांनी हरितगृह वायू उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्याचे वचन दिले आहे. जेणेकरून वैश्विक तापमानात होणारी वाढ ही २ डिग्री सेल्सिअस पर्यंत मर्यादित राहू शकेल आणि तापमानवाढ १.५ डिग्री सेल्सियसपेक्षा कमी राहील.

  हे लक्ष्य साध्य करण्यासाठी जगातील बर्‍याच शहरांनी त्यांचे कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन नेट-शून्यपर्यंत कमी करण्याचे वचन दिले आहे. म्हणजे शक्य तितक्या विजेवर चालण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी वाहनांचे रूपांतर, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी उद्योगांना पवन ऊर्जा, जलविद्युत, सौर उर्जा आणि भू-औष्णिक प्रकल्पांवर स्विच करण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहित केले जाईल.

  तथापि, विशिष्ट क्षेत्रांमध्ये कार्बन उत्सर्जन थांबविले जाऊ शकत नाही उदाहरणार्थ जड वाहने विद्युत उर्जेवर चालवू शकत नाहीत. या कार्बन उत्सर्जनाची भरपाई करण्यासाठी शहरांनी CO 2 शोषण्यासाठी झाडे लावावीत जेणेकरून एकूण कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन शून्य राहील. २०५० पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या शहरांद्वारे जागतिक मोहीम रेस टू झिरो म्हणून ओळखली जाते. या मोहिमेचे उद्दीष्ट या वर्षाच्या अखेरीस आयोजित करण्यात येणाऱ्या ग्लासगो येथे युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्स, COP 26 च्या अगोदर डेकारबोनइज्ड अर्थव्यवस्थेकडे गती निर्माण करणे हे आहे.

  महाराष्ट्राचे पर्यावरण तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पृथ्वी दिनाच्या दिवशी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद शहर रेस टू झिरो मोहिमेमध्ये सहभागी होतील असे जाहीर केले. या मोहिमेत महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांची मोठी भूमिका राहणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत विशेष हवामान बदल व जागतिक तापमान वाढ विभाग असून स्मार्ट सिटी च्या या विभागाच्यावतीने मोहिमेचे नियोजन केले जात आहे.

  उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पर्यावरणपूरक निर्णय घ्यावे लागतील: आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय

  निव्वळ शुन्य कार्बन उत्सर्जनाच्या रेस टू झिरो या मोहिमेबाबत बोलताना औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय म्हणाले की ,हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी शहराला पर्यावरणपूरक निर्णय घ्यावे लागतील. “आम्ही निव्वळ शून्य लक्ष्याकडे पाऊल टाकण्यास सुरवात केली आहे. त्यादृष्टीने घनकचरा व्यवस्थापन, खामनदी पुनरुज्जीवन आणि शहरातील सायकलिंग पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आम्ही पाऊले टाकले आहेत. परंतु अजून बराच पल्ला गाठायचा आहे आणि आम्हाला सर्व भागधारकांच्या भागीदारीची आवश्यकता आहे, असे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पाण्डेय म्हणाले.

  हे सुद्धा वाचा