प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

    औरंगाबाद (Aurangabad) : पोलीस महासंचालक कार्यालय, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेद्वारे  राज्यातील पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्हयांचा तपास, कायदा सुव्यवस्था राखणे इत्यादी मापदंडाचे आधारे पोलीस घटकांचे कामाचे मुल्यांकन निकषाद्वारे सकारात्मक, नकारात्मक मापदंड द्वारे जानेवारी-2020 ते डिसेंबर-2020 या कालावधीत दाखल गुन्हयांची व वार्षिक गुन्हेगारीच्या आधारावर पेालीस महासंचालक कार्यालयाकडून श्रेणी तयार करण्यात आली.

    घटक कार्यालयाची  “A” “B”, “C”  अशा तिन श्रेणी मध्ये विभागणी करण्यात आली होती यामध्ये  “A”श्रेणी मध्ये 24 घटक कार्यालये  तर  “B” श्रेणी मध्ये 24 घटक कार्यालयांची निवड करण्यात आली होती. या नमुद तीन वेगवेगळया श्रेणीतुन “सर्वोकृष्ट पोलीस घटक” विविध मापदंडाचे आधारे  मुल्यांकन समितीद्वारे पडताळणी करण्यात आली आहे.

    मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक यांचे नेतृत्वामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय, औरंगाबाद ग्रामीण यांनी संपुर्ण निकषावर उत्तम कामगिरी करत संपुर्ण राज्यातुन सर्व श्रेणीमध्ये “ सर्वोकृष्ट पोलीस घटक” म्हणुन पोलीस महासंचालक कार्यालयाचे मुल्यांकन समितीने  पोलीस अधीक्षक कार्यालय, औरंगाबाद ग्रा. यांची निवड करून घोषीत केले आहे.

    सर्वोकृष्ट पोलीस घटक निवडी  करिता पुढील प्रमाणे मापदंड ठरविण्यात आले  होते यामध्ये 1) गुन्हे तपास 2) गुन्हे निर्गती 3) दारुबंदी/ जुगार कारवाई 4) सायबर 5) Action against habitual offenders  6) Action against illegal activities 7) पाहिजे/ फरारी आरोपी अटक 8) दुर्बल घटकांविरूध्दच्या गुन्हयांची निर्गती 9) मिळुन न आलेले हरविलेले व्यक्ती 10) ITSSO 11) समन्स वाँरट बजावणी 12) दोषसिध्दी 13) रस्ते अपघात व मृत्यु दर 14) मुद्देमाल निर्गती 15) प्रलंबीत पासपोर्ट पडताळणी 16) श्वान व अंगुलमुद्रा पथक  गुणवत्ता  तसेच  प्रशासकिय श्रेणी मधील मापदंड 1) परेड 2)  सेवा पुस्तिका व शेरे 3) प्रलंबित पेन्शन प्रस्ताव 4) प्रलिंबित प्राथमिक व विभागीय चौकशी 5) गैरपगारी अनुदान वापर 6) प्रलंबित वैद्यकिय देयके 7) सेवाअंतर्गत प्रशिक्षण 8) पदोन्नती

    या सर्व निकषावर पोलीस अधीक्षक कार्यालय , औरंगाबाद ग्रामीण यांची कामगिरी ही सर्वोकृष्ट असुन त्याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाकडुन “सर्वोकृष्ट पोलीस घटक” म्हणुन गौरविण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक यांनी याबाबतचे श्रेय जिल्हयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना देत त्यांचे अभिनंदन केले आहे.