औरंगाबादकरांची चिंता वाढली; शहरातील कोरोना रुग्ण संख्येत होतेय मोठी वाढ

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या सलग तीन दिवसांपासून पाच रुग्ण वाढ असलेल्या शहरात शनिवारी अचानक २३ रुग्ण आढळून आले. दरम्यान यामुळे मनपा प्रशासनाची चिंता वाढली आहे. इतकेच नाही तर ग्रामीण भागातील रुग्ण संख्येतही वाढ दिसून आली.

    औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या सलग तीन दिवसांपासून पाच रुग्ण वाढ असलेल्या शहरात शनिवारी अचानक २३ रुग्ण आढळून आले. दरम्यान यामुळे मनपा प्रशासनाची चिंता वाढली आहे. इतकेच नाही तर ग्रामीण भागातील रुग्ण संख्येतही वाढ दिसून आली. शनिवार ग्रामीण भागात ११ रुग्णांची भर पडली. संभाव्य तिसरी लाट आणि आगामी काळात असलेले सण-उत्सव यामुळे ही आकडेवारी चिंतेत वाढ करणारी आहे.

    औरंगाबादेत किती रुग्णांची संख्या आहे?

    औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी १७ जणांना (मनपा ८, ग्रामीण ९) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष ४४ हजार २८३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शनिवारी एकूण ३४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष ४७ हजार ९८३ झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार ५२९ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण १७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

    मनपा परिसरात चिंता वाढली

    मनपा परिसरात कोरोना रुग्ण वाढ झाल्याने मनपाची चिंता वाढली आहे. मनपा हद्दीमधील सातारा पोलीस स्टेशन परिसर १, हर्सूल परिसर १२, चिकलठाणा १, महाजन कॉलनी १, बीड बायपास परिसर ३, तापडिया नगर १, कुंभारवाडा परिसर २, होनाजी नगर १, तर शिवाजी नगर भागातील एका रुग्णांची भर पडली आहे. दुसरीकडे औरंगाबाद ग्रामीणमध्ये ४, गंगापूर ४, वैजापूर १ तर पैठण तालुक्यातील २ रुग्णांची भर पडली आहे.