3 people arrested in aurangabad

औरंगाबादमधील शासकीय रुग्णालयातून रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी (remdesivir injection theft) करून विकणाऱ्या तिघांना(remdesivir black market) पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली आहे.

    ‌‌‌‌औरंगाबाद : येथील शासकीय रुग्णालयातून रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी (remdesivir injection theft) करून विकणाऱ्या तिघांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघेही विना प्रिस्क्रिप्शन, विना पावतीचे रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या भावाने विकत असल्याची माहिती समोर आली आहे.

    इंजेक्शनची विक्री करणाऱ्यांमध्ये शासकीय रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. त्यामुळे रेमडेसिवीर विक्रीच्या काळा बाजाराचे रॅकेटच कार्यरत असल्याचे यावरून बोलले जात आहे. या कर्मचाऱ्यासह २ मेडिकल चालकांनाही पोलिसांनी अटक केली आहे. हे एक रेमडेसिवीर इंजेक्शन तब्बल १५ हजार रुपयांना विकत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सापळा रचून या तिघांना जेरबंद केले आहे.

    डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नसताना इंजेक्शन विक्री करत असल्याची महिती मिळताच पुंडलिक नगर पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये अनिल बोहते असे घाटी रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याल अटक केली आहे. त्याच्यासह मंदार भालेराव आणि अभिजीत तौर अशा दोन मेडिकल चालकांनाही अटक करण्यात आली आहे.