ban plastic

महापालिकेच्या नागरिक मित्र पथकांनी गुरूवारी दि.१४ बाबा पेट्रोल पंपाजवळ प्लास्टिकच्या पिशव्यांनी भरून जाणारे वाहन पकडले. या कारवाईत तब्बल पावणे सात क्विंटल प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच संबंधित गौरी प्लास्टिक कंपनीकडून २५ हजार रूपयांचा दंडही वसूल केला.

औरंगाबाद. महापालिकेच्या नागरिक मित्र पथकांनी गुरूवारी दि.१४ बाबा पेट्रोल पंपाजवळ प्लास्टिकच्या पिशव्यांनी भरून जाणारे वाहन पकडले. या कारवाईत तब्बल पावणे सात क्विंटल प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच संबंधित गौरी प्लास्टिक कंपनीकडून २५ हजार रूपयांचा दंडही वसूल केला.

राज्य शासनाने राज्यात कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. तेव्हापासून औरंगाबाद पालिकेने शहरात कारवाईसाठी नागरिक मित्र पथकाची स्थापना केली आहे. या पथकाने गुरूवारी शहरातील मोती कारंजा येथील गौरी प्लास्टिक कंपनीचे सुमारे ६७५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले. मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्यांचा साठा घेऊन एक तीन चाकी अ‍ॅपे वाहन बाबा पेट्रोल पंपाजवळील चौकातून जात होते.

पालिकेच्या नागरिक मित्र पथकाच्या कर्मचार्‍यांची त्यावर नजर पडली. कर्मचार्‍यांना संशय येताच त्यांनी वाहनाला आडवे होऊन थांबविले. वाहनात डोकावून पाहताच मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित प्लास्टिक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित ६७५ किलोचे प्लास्टिक जप्त करत या पथकाने गौरी प्लास्टिक कंपनीला २५०००० रूपयांची पावती देत दंड वसूल केला. ही कारवाई घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख प्रमोद जाधव यांच्या पथकाने केली.