mahavitran

औरंगाबाद: वीज चोरीचे(electricity theft) आकडे काढण्याची मोहीम महावितरणकडून सुरू करण्यात आली आहे. वीज चोरीचे आकडे काढल्यावरून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यास खुपसून टाकण्याची धमकीही देण्यात आल्यावरून बीडमध्ये सहा जणांविरूध्द गुन्हा(crime) दाखल करण्यात आला आहे.

महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ नरेश गिते यांनी वीज चोरीचे आकडे काढून रोहित्र जळण्याचे प्रमाण कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप भोळे, अधिक्षक अभियंता आर जी कोलप यांच्या मार्गदर्शनाखाली वीज चोरीचे आकडे काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

काटकर वस्ती, खापरपागंरी, बीड येथील वस्तीवर वीज चोरीचे आकडे टाकून विजेचा वापर होत असल्याचे महावितरण कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ ज्ञानेश्वर शिंदे व त्यांचे सहकारी संदीप पाखरे, किरण अंदुरे, रामेश्वर लाटे, गणेश जाणवळे यांनी येथील वीज चोरीचे आकडे काढले. आकडे का काढले म्हणून काढलेले आकडे हिस्कावून घेवून अंगद रावसाहेब काटकर व त्यांची पत्नी, सुग्रीव रावसाहेब काटकर, बाळू बाबासाहेब काटकर, बाबासाहेब रावसाहेब काटकर, मनोज सुग्रीव काटकर यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करून शिवीगाळ केली. पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यास खुपसून टाकू अशी धमकी दिली. याप्रकरणी वरिष्ठ तंत्रज्ञ ज्ञानदेव शिंदे यांच्या फिर्यादिवरून भादंवि ३५३, ३३२, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीज चोरीचे आकडे काढण्याची मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे. जनतेने अधिक्रत वीज जोडणी घेवूनच वीज जोडणी घेवून विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.