पंकजा मुंडे यांना मोठा दणका! वैद्यनाथ साखर कारखान्यावर कारवाई

साखर कारखान्याकडे मार्च २०१८ ते ऑगस्ट २०१९ या काळातील कर्मचारी आणि कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची एकूण १.४६ कोटींची रक्कम थकीत होती. उर्वरित ५६ लाख रुपयांच्या वसुलीसाठी कार्यवाही सुरु असल्याचे ईपीएफओ कार्यालयाने सांगितले आहे. सर्व थकबाकीदारांनी थकीत भविष्य निधी देयकांचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त जगदीश तांबे यांनी केले आहे.

    भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या ताब्यातील पांगरी (जि. बीड) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) विभागाने कारवाई केली. कामगारांच्या हक्काचे पीएफ थकविल्या प्रकरणी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाने कारवाई करत ९२ लाखांची वसूली केली. उर्वरित रक्कम वसूलीसाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

    पीएफचे एक कोटी ४६ लाख रुपये थकल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. ईपीएफओच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाने पांगरी (ता. पर‌ळी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते जप्त केले. तब्बल ९२ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी सुधीर वानखेडे यांनी ही कारवाई केल्याची माहिती आहे.