BJP MLA Prashant Bamb charged with embezzling crores; Bamb revelation

माझ्यावर दाखल झालेला गुन्हा हा खोटा आहे. दाखल झालेला एफआयआर हा पूर्णपणे खोटा ठरेल” असे बंब यांनी म्हंटले आहे. माझे विरोधक बिनडोक आहेत. ते एक दिवस तोंडघाशी पडतील - प्रशांत बंब

औरंगाबाद : औरंगाबादमधील गंगापूर तालुक्याचे भाजपा आमदार प्रशांत बंब (prashant bamb) यांच्यासह १६ जणांविरोधात कोट्यावधींचा अपहार केल्याप्रकरणी   गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्र वापरून गंगापूर साखर कारखान्याच्या सभासदांची १५ कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचा आरोप प्रशांत बंब यांच्यावर करण्यात आला असून प्रशांत बंब यांना अटक झाली नसली तरी  गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. माझ्यावर दाखल झालेला गुन्हा हा खोटा आहे. दाखल झालेला एफआयआर हा पूर्णपणे खोटा ठरेल” असे बंब यांनी म्हंटले आहे. माझे विरोधक बिनडोक आहेत. ते एक दिवस तोंडघाशी पडतील, अशी टिकाही प्रशांत बंब यांनी विरोधकांवर केली आहे.

या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत असून प्रशांब बंब यांचीही चौकशी होणार असल्याचे समजते.

गंगापूर साखर कारखान्याची विक्री होऊ नये म्हणून सभासदारांनी पैसे गोळा केले होते. ही सर्व रक्कम कारखान्याच्या खात्यात आहे. पण, या रक्कमेचा कारखान्याशी काहीही संबंध नाही, असा दावाच कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब यांनी केला आहे. त्यामुळे सभासदांनी एकत्र येऊन थेट पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.

२०१३ मध्ये गंगापूर साखर कारखाना विक्रीसाठी काढण्यात आला होता. पण, सभासदांनी डीआरटी कोर्टात पैसे जमा केले होते. त्यानंतर हा विक्रीचा व्यवहार रद्द करण्यात आला होता. त्यामुळे कोर्टाकडून ही रक्कम कारखान्याच्या खात्यात जमा झाली. पण, आता प्रशांत बंब यांनी जमा झालेल्या पैशांवर कारखान्याचा संबंध नसल्याचा अजब दावा केला आहे.  त्यामुळे १४ सदस्यांनी बंब यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.