Unveiling of a huge statue of Shiv Sena chief Hindu Heart Emperor Balasaheb Thackeray

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादमधील स्मारकाच्या कामाला ब्रेक लागला आहे. या स्मारकाचे काम तूर्तास ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. औरंगाबादेतील महात्मा गांधी कॅम्पसमधील प्रियदर्शनी उद्यानामधील अनेक झाडं तोडून स्मारक उभं करण्याच्या योजनेला अनेक पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवलाय.

    औरंगाबाद : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादमधील स्मारकाच्या कामाला ब्रेक लागला आहे. या स्मारकाचे काम तूर्तास ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. औरंगाबादेतील महात्मा गांधी कॅम्पसमधील प्रियदर्शनी उद्यानामधील अनेक झाडं तोडून स्मारक उभं करण्याच्या योजनेला अनेक पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवलाय.

    प्रियदर्शनी उद्यानातील झाडं तोडून स्मारक उभं करण्याच्या योजनेला अनेक पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवला. झाडे वाचवण्यासाठी प्रियदर्शनी बचाव मोहीम सुरु करण्यात आली होती.

    याची दखल घेत न्यायालयाने कामाची पाहणी केली आणि अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील देशमुख आणि न्यायमूर्ती आहुजा यांनी तूर्तास ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अहवालानंतर औरंगाबाद खंडपीठ पुढील निर्णय देणार आहे.

    औरंगाबादमध्ये बाळासाहेबांच्या प्रखर राष्ट्रवादी ज्वलंत हिंदुत्वाची प्रेरणा देणारं स्मारक उभारणार आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी डिसेंबर २०२० मध्ये केली होती. हिंदुत्ववादी म्हणजे राष्ट्रीयत्व सांगणारे हे स्मारक असेल असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले होते.