BJP MP Sujay Vikhe Patil is in trouble for secretly bringing illegal stocks of Remedesvir

भाजपा खासदार सुजय विखे यांनी खाजगी विमानाने अहमदनगरला आणलेल्या १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने पूर्ण माहिती मागवली आहे. १० ते २५ एप्रिल पर्यंत किती खाजगी विमाने आली आणि त्यात काय सामान होते याचीही माहिती कोर्टाने मागितली आहे. विमानतळ प्राधिकरणाने ही सगळी माहिती कोर्टाला द्यायची आहे. औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. बी. यू. देबडवार यांनी शिर्डी विमानतळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले. दरम्यान, या प्रकरणात काही रुग्णांच्या वतीने दाखल करण्यात आलेले हस्तक्षेप अर्ज न्यायालयाने फेटाळले.

    औरंगाबाद : भाजपा खासदार सुजय विखे यांनी खाजगी विमानाने अहमदनगरला आणलेल्या १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने पूर्ण माहिती मागवली आहे. १० ते २५ एप्रिल पर्यंत किती खाजगी विमाने आली आणि त्यात काय सामान होते याचीही माहिती कोर्टाने मागितली आहे. विमानतळ प्राधिकरणाने ही सगळी माहिती कोर्टाला द्यायची आहे. औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. बी. यू. देबडवार यांनी शिर्डी विमानतळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले. दरम्यान, या प्रकरणात काही रुग्णांच्या वतीने दाखल करण्यात आलेले हस्तक्षेप अर्ज न्यायालयाने फेटाळले.

    जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद

    नगरचे जिल्हाधिकारी खा. विखे यांना पाठीशी घालत असल्याचे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले. राज्याच्या गृह विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस बजावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांचे वर्तन खासदार सुजय विखेना वाचवण्यासारखे असल्याचं कोर्टाने म्हटले. नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत सुजय विखे यांनी केलेल्या कृतीचे समर्थन केले होते.

    गुन्हा दाखल करण्याची मागणी

    कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालेला असताना विखे यांनी विमानाने10 हजार इंजेक्शन आणले. यावर सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, एकनाथ घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी औरंगाबाद खंडपीठात अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत फौजदारी याचिका दाखल करून सदर प्रकरणात विखे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी विनंती केली आहे.