औरंगाबादमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्राद्रुर्भावर केंद्रीय पथकाने केली पाहणी

  • औरंगाबादमधील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करुन आरोग्य विभागाला वेगवेगळ्या उपाययोजना आणि मार्गदर्शक सूचना दिल्या. तसेच सर्व प्रतिबंधित क्षेत्रात पाहणी दौरा करुन जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. पुढील अहवाल वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचे समजत आहे.

औरंगाबाद – मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबादमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. औरंगाबादमध्ये कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोना बाधित रुग्णांची वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने वाळूज औद्योगिक भागात भेट देऊन पाहणी केली आहे. या परिसरात बजाज ऑटो कंपनी, बजाजनगरातील लोकमान्य चौक तसेच अन्य भागांची पाहणी केली. पथकाने आरोग्य विभागाच्या कोविड सेंटरला देखील भेट दिली आहे. 

औरंगाबादमधील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करुन आरोग्य विभागाला वेगवेगळ्या उपाययोजना आणि मार्गदर्शक सूचना दिल्या. तसेच सर्व प्रतिबंधित क्षेत्रात पाहणी दौरा करुन जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. पुढील अहवाल वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचे समजत आहे.