उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब रविवारी १२:३० वा.झुम मिटींग व फेसबुक लाईब्ह द्वारे प्रचार सभा घेणार आहेत असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी कळविले आहे.

  • मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणूक-२०२०

औरंगाबाद (Aurangabad). मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब रविवारी १२:३० वा.झुम मिटींग व फेसबुक लाईब्ह द्वारे प्रचार सभा घेणार आहेत असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी कळविले आहे.

ही प्रचार सभा आभासी पद्धतीने होणार असून मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ही सभा ऐकली जाणार आहे aurangabad शहरामध्ये सुद्धा संभाजीनगर मध्य शहरात तापडिया नाट्य मंदिर या ठिकाणी Aurangabad पूर्व शहर व फुलंब्री विभागसाठी हॉटेल विंडसर कॅसल सिडको बस स्टँड या ठिकाणी Aurangabad पश्चिम विभागासाठी हॉटेल विट्स रेल्वे स्टेशन रोड या ठिकाणी सभा ऐकता येणार आहे. शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व पदवीधर मतदार यांनी या सभेस अवश्य उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने करण्यात आले असून शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपजिल्हाप्रमुख ,शहरप्रमुख उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभागप्रमुख ,शाखा प्रमुख महिला आघाडी व युवासेना यांनीसुद्धा या आभासी सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.