उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते सिंचनाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या काही योजनांचं उद्घाटन होणार आहे. मराठवाड्यातील सिंचनाची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीनं हे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरेंनी साताऱ्यात कोयना वीज प्रकल्पाचा आढावा घेतला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (शनिवार) औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते काही जलसिंचन योजनांचं उद्घाटन करणार आहेत. मराठवाड्यासाठी हा दौरा महत्त्वाचा आणि लक्षवेधी आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते सिंचनाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या काही योजनांचं उद्घाटन होणार आहे. मराठवाड्यातील सिंचनाची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीनं हे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरेंनी साताऱ्यात कोयना वीज प्रकल्पाचा आढावा घेतला होता.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री ठाकरेंनी मुंबईच्या बाहेर दौरे काढायला सुरुवात केल्याचं चित्र आहे. कोरोना काळात मुंबईतच थांबावं लागलेल्या मुख्यमंत्र्यांनी आता कोरोनाचा भर ओसरत असतानाच महाराष्ट्राच्या इतर भागात दौरे काढायला सुरुवात केलीय. महाराष्ट्रात जानेवारी महिन्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनंदेखील या दौऱ्याकडं पाहिलं जातंय.

शिवसेनेनं सध्या शहरी भागासोबतच ग्रामीण भागाकडं लक्ष केंद्रीत केलंय. पक्षाचा शहरी तोंडवळा बदलून ग्रामीण भागातील मतदान वाढावं, यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू असल्याचंही सांगितलं जातंय.