कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी मनपाच्या उपाय योजना; प्रशासक आस्तिक कुमार पांडेय

प्रशासनाने त्यादृष्टीने तीन स्तरावर तयारी सुरू केली आहे. यासाठी शहरातील सर्व बालरोग तज्ज्ञाची बैठक घेण्यात आली असून मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर उभा करणे, एमजीएम मधील स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे लहान मुलांसाठी १०० बेडचे कोव्हीड केअर सेंटर, गरवारे कंपनी मध्ये १०० बेडचे बाल कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. मेडीसीन व टेस्टिंग ची तयारी करण्यात येत आहे.

    औरंगाबाद: कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यास यशस्वी होत असताना तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या लाटेत बालकांना कोरोना होऊन बरे झाल्यानंतर होणारा पोस्ट कोविडचा धोका जास्त असल्याचे बाल रोग तज्ञ यांचे मत आहे या पोस्ट कोव्हीड पासून बालकांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने सर्वतोपरी तयारी सुरू केली आहे. ही तिसरी लाट रोखण्यास औरंगाबाद महानगरपालिका यशस्वी होईल असे महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीस माहिती देताना सांगितले.कोरोना संदर्भात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महानगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या व नागरिकांच्या सहकार्यामुळे यशस्वी झाले आहे.

    दरम्यान तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असून या कोरोनाच्या लाटेत बालकांना कोरोनापेक्षा पोस्ट कोविडचा जास्त धोका असल्याचे बालरोग तज्ञांचे म्हणणे आहे. कोरोना बरा झाल्यानंतर निगेटिव्ह इम्पॅक्ट दीड ते दोन महिने बालकाच्या शरीरावर राहू शकतो याची नागरिकांनी काळजी घ्यावी. या पोस्ट कोव्हीड पासून बालकांना गंभीर त्रास होणार नाही यासाठी महानगरपालिका विविध उपाययोजनां करणार आहे. प्रशासनाने त्यादृष्टीने तीन स्तरावर तयारी सुरू केली आहे. यासाठी शहरातील सर्व बालरोग तज्ज्ञाची बैठक घेण्यात आली असून मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर उभा करणे, एमजीएम मधील स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे लहान मुलांसाठी १०० बेडचे कोव्हीड केअर सेंटर, गरवारे कंपनी मध्ये १०० बेडचे बाल कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. मेडीसीन व टेस्टिंग ची तयारी करण्यात येत आहे.
    तिसर्‍या लाटेत बालकांना सुरक्षित ठेवण्यात महानगरपालिका प्रशासन यशस्वी होईल. याच बरोबर लसीकरणाचा वेग जर वाढला तर तिसऱ्या लाटेचा धोका कमी होईल परंतु १०० टक्के व्हॅक्सिनेशन होत नाही तोपर्यंत गाफील राहून चालणार नाही. कोव्हीड रुग्णांची संख्या कमी होत असताना दिसत आहे ,यामागचे कारण ब्रेक दि चैन, व्हॅक्सिनेशन व नागरिकांची स्वयंशिस्त हे आहे.
    हळूहळू ब्रेक दी चैन, लॉक डाऊन कमी होणार आहे. पण नागरिकांनी स्वयंशिस्त न पाळल्यास रुग्ण संख्येत वाढ होईल, म्हणून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, लग्न, समारंभात गर्दी करू नये, मास्कचा वापर, सनीटायझर, सोशल डिस्टन्स या त्रिसूत्री चे पालन करावे .असे सांगून प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले की ,आपणास सर्वांना २०२२ पर्यंत मास्क वापरावा लागणार आहे.
    संपूर्ण भारतामध्ये औरंगाबाद महानगरपालिकेचे नाव कोरोना संदर्भात उपाययोजना करत असतांना उंचावले गेले आहे. औरंगाबाद शहरात २०००० रुग्ण असताना त्यांच्यावरील औषध उपचार त्यांच्या जेवणाची व्यवस्था, त्यांची वाहतूक व्यवस्था, राहण्याची व्यवस्था या सर्व गोष्टींमध्ये महानगरपालिका प्रशासन कुठेही कमी पडले नाही. औरंगाबाद महानगरपालिकेचा उपाययोजनेचा पॅटर्न वापरून इतर शहर कार्यवाही करत आहे.