BJP MP Sujay Vikhe Patil is in trouble for secretly bringing illegal stocks of Remedesvir

विनापरवाना रेमडेसिवीर इंजेक्शनाचा साठा व वाटप केल्या प्रकरणात अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांच्याविरोधात हायकोर्टात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये याचिकाकर्त्यांनी आता दुरुस्ती अर्ज दाखल केला आहे. एका बातमीच्या आधारे राज्यात विविध ठिकाणी काही राजकीय नेत्यांनी कायदेशीर अधिकार नसताना रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप केल्याचा आरोप केला आहे. न्यायालयाने या सर्वांवर कारवाई करावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. या याचिककर्त्यांचा रोख माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, शरद पवार व रोहित पवार, आमदार अमरीश पटेल यांच्याकडे होता.

  औरंगाबाद : विनापरवाना रेमडेसिवीर इंजेक्शनाचा साठा व वाटप केल्या प्रकरणात अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांच्याविरोधात हायकोर्टात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये याचिकाकर्त्यांनी आता दुरुस्ती अर्ज दाखल केला आहे. एका बातमीच्या आधारे राज्यात विविध ठिकाणी काही राजकीय नेत्यांनी कायदेशीर अधिकार नसताना रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप केल्याचा आरोप केला आहे. न्यायालयाने या सर्वांवर कारवाई करावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. या याचिककर्त्यांचा रोख माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, शरद पवार व रोहित पवार, आमदार अमरीश पटेल यांच्याकडे होता.

  सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी खासदार विखे यांना कठोर शब्दात फटकारले. तुम्ही जर एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी काम करत असताना बेकायदेशीर मार्गाचा वापर केला तर तो कधी शुद्ध नसतो, अशा शब्दांत न्यायमूर्ती घुगे यांनी विखेंची कानउघडणी केली. विखे यांनी रेमडेसीवीर इंजेक्शन विमानातून घेऊन आल्यानंतर व्हिडीओ चित्रित केला. हा ड्रामा करण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. आपण मतदारसंघातील खासदार असून दिल्लीत आपले वजन वापरून कशा प्रकारे इंजेक्शन्स आणली, हे सांगण्याचा दिखाऊपणा होता, तो टाळता आला असता, असे खडेबोलही न्यायमूर्तींनी सुनावले.

  जिल्हाधिकाऱ्यांचे शपथपत्र सादर

  १७००  रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्लीतून नाही तर चंदीगड येथून नियमाप्रमाणे खरेदी केले होते. त्यातील १२०० इंजेक्शन हे चंदीगड येथून खासगी विमानाने शिर्डी येथे आणल्याचा युक्तीवाद खासदार सुजय विखे यांच्यावतीने हायकोर्टात करण्यात आला. डॉ. विखे आणि त्यांच्या रुग्णालयाला १७०० रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली होती. तशी रीतसर नोंद जिल्हा शल्यचिकित्सकांकडे करण्यात आली होती. परंतू इंजेक्शनचा साठा खासगी विमानाने शिर्डी येथे आणण्याबाबत आपल्याला काहीच कल्पना नव्हती, असे शपथपत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

  प्रधान सचिव, गृह विभाग आणि नगरचे पोलीस अधीक्षक यांनी हायकोर्टाच्या आदेशानुसार, रेमडेसिवीर इंजेक्शनबाबतचा अहवाल न्यायालयात सादर केला. न्यायमूर्ती आर. व्ही. घुगे आणि न्यायमूर्ती बी. यु. देबडवार यांनी अहवाल रेकॉर्डवर घेतले. यातील फौजदारी याचिकेवर बुधवार 5 मे रोजी सुनावणी होणार आहे.

  खासदार विखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा शासनाने जप्त करावा व गरजू रुग्णांना जिल्हाधिकाऱ्यांनी समन्याय पद्धतीने वाटप करावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर, अ‍ॅड. अजिंक्य काळे, अ‍ॅड. उमाकांत आवटे व अ‍ॅड. राजेश मेवारा हे याचिकाकर्त्यांच्यावतीने काम पाहत आहेत तर शासनाच्यावतीने अ‍ॅड. डी. आर. काळे यांनी काम पाहिले.