लवकरात लवकर शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्या, अन्यथा…. भाजप आमदाराचा ठाकरे सरकारला इशारा

शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत भाजपकडून निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 18 महिन्यांपासून ग्रामीणसह शहरातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात नाहीत. या वयात योग्य शिक्षण न मिळाल्यास संपूर्ण पिढी बरबाद होऊ शकते. अनेक विद्यार्थी मला येऊन भेटतात, त्यांच देखील म्हणणे आहे की लवकर शाळा लवकर सुरू कराव्यात.

    औरंगाबाद : शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे शासनाने नियमावली तयार करून शाळा सुरू कराव्यात. अन्यथा सोमवारपासून स्वनियमावली तयार करून औरंगाबादसह राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग एकाच दिवशी सुरू करण्यात येतील, असा इशारा भाजपाचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत राज्य सरकारला दिला.

    शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत भाजपकडून निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 18 महिन्यांपासून ग्रामीणसह शहरातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात नाहीत. या वयात योग्य शिक्षण न मिळाल्यास संपूर्ण पिढी बरबाद होऊ शकते. अनेक विद्यार्थी मला येऊन भेटतात, त्यांच देखील म्हणणे आहे की लवकर शाळा लवकर सुरू कराव्यात.

    शाळा सुरु न केल्यास विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होईल. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी 50 टक्के क्षमतेसह एका बॅचवर एक विद्यार्थी या प्रमाणे मुलांना शाळेत बोलवावे. गणित, इंग्रजी आणि विज्ञान हे तीन विषयांचे तरी वर्ग तरी सुरु करण्यास शासनाने परवानगी द्यावी, किंवा परवानगी नाकारली असे कळविण्यात यावे. अन्यथा येत्या 23 ऑगस्टपासून स्वनियामवली तयार करुन राज्यभरात एकाच दिवशी शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस सुरु करण्यात येतील, असा इशारा बागडे यांनी राज्य सरकारला दिला आहे.