राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते शिवना येथील प्राथमिक केंद्र ईमारत व रुग्णवाहिकाचे लोकार्पण

आरोग्याच्या जास्तीत जास्त सुविधा निर्माण करण्यासाठी जि. प.च्या आरोग्य विभागाने प्रस्ताव सादर करावा जिल्ह्यात आवश्यक तेथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तात्काळ मंजुरी देवु सोबतच आरोग्य विभागातील रिक्त जागांची भरती करून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक केंद्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देवू अशी ग्वाही महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवना येथे दिली.

    सिल्लोड : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सिल्लोड – सोयगाव मतदार संघात आरोग्य सुविधेचे मोठ्या प्रमाणावर बळकटीकरण करण्यात आले असून जिल्ह्यात आरोग्याच्या जास्तीत जास्त सुविधा निर्माण करण्यासाठी जि. प.च्या आरोग्य विभागाने प्रस्ताव सादर करावा जिल्ह्यात आवश्यक तेथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तात्काळ मंजुरी देवु सोबतच आरोग्य विभागातील रिक्त जागांची भरती करून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक केंद्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देवू अशी ग्वाही महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवना येथे दिली.

    शिवना येथे सर्व सुविधेने सुसज्ज अशा नव्याने उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्र ईमारत, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच्या निवासस्थान व रुग्णवाहिकेचे लोकार्पण महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी मार्गदर्शन करीत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.

    तसेचं पुढे बोलत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, विविध ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यासह सोयगाव तालुक्यातील जरंडी व सावळतबारा येथे सर्व सुविधेने सुसज्ज असे प्राथमिक केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आहेत. अंभई, भराडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे अद्यावतीकरण काम सुरू असून फर्दापूर येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राला येत्या काळात मंजुरी दिल्या जाईल. सोयगाव आणि सिल्लोड येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लॅन्टसह कोविड सेंटरचे काम अंतिम टप्यात असल्याने लवकरच याचे लोकार्पण होईल. या सोबतच सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात 100 खाटांची मंजुरी देण्यात आली आहे.पूर्वी येथे 50 खाटांची सुविधा होती. यासह मतदारसंघात खाजगी रुग्णालयात पूर्वीपेक्षा आयसीयू, सिटीस्कॅन, ऑक्सिजन इत्यादी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यात लवकरच आरोग्य विभागात 300 रिक्त जागांची भरती होणार असल्याने शिवना येथील नवीन प्राथमिक केंद्रात रिक्त जागा भरल्या जाईल असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

    कार्यक्रमास माजी जि. प. सदस्य मुरलीधर काळे, राजू बाबा काळे, हाजी शेख सलीम, रामेश्वर काळे, माजी सरपंच उस्माईल कुरेशी, उपसरपंच गणेश सपकाळ, किशोर जगताप, संदीप राऊत, रियाज शेख, इम्रान मोबिन, विनायक काटकर, अन्सार चाऊस, कासम काझी, शेख राजीक, वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण पारधे, डॉ. जवेरीया शेख, डॉ.प्रियंका पवार, डॉ. गावंडे, डॉ. योगेश राजपूत आदींसह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व गावकऱ्यांची उपस्थिती होती.