विकास प्रकल्पासाठी शासनाकडे ७८२ कोटी रुपये निधीची मागणी; आस्तिक कुमार पाण्डेय, मनपा प्रशासक

Aurangabad महानगरपालिका प्रशासनाने शहर विकासाची विविध प्रकल्प पूर्ण केली आहेत. उर्वरित त्या प्रकल्पाचे काम सुरू असून दहा ते बारा महिन्यात पूर्ण होतील. त्यापैकी काही स्मार्ट सिटीच्यावतीने विकास प्रकल्पाचे काम सुरू आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज म्युझियमसाठी 25 कोटी, स्वातंत्र्यवीर सावरकर संशोधन केंद्रासाठी 25 कोटी.......

  औरंगाबाद (Aurangabad) : महानगरपालिकेच्या वतीने शहर विकासाचे विविध 21 प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यापैकी 90 टक्के प्रकल्पाची कामे पूर्ण झाली आहेत; उर्वरीत कामे लवकरच पूर्ण होतील. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम, स्वातंत्र्यवीर सावरकर संशोधन केंद्र, गरवारे स्टेडियम विकास, सातारा देवळाई व गुंठेवारी भागात ड्रेनेज लाईन व नवीन रस्त्यासाठी ३०० कोटी आदी विकास प्रकल्पासाठी ७८२ कोटीची गरज आहे. यासंदर्भात शासनाकडे निधीची मागणी केली असल्याचे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितले.

  १७ सप्टेंबर २०२१ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा व औरंगाबाद महानगरपालिकेच्या विकास प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले .यावेळी महानगरपालिकेच्यावतीने राबवण्यात येत असलेल्या विविध विकास कामाच्या प्रकल्पाचे सादरीकरण आज शुक्रवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी महानगरपालिका आयुक्त प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.

  Aurangabad महानगरपालिका प्रशासनाने शहर विकासाची विविध प्रकल्प पूर्ण केली आहेत. उर्वरित त्या प्रकल्पाचे काम सुरू असून दहा ते बारा महिन्यात पूर्ण होतील. त्यापैकी काही स्मार्ट सिटीच्यावतीने विकास प्रकल्पाचे काम सुरू आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज म्युझियमसाठी 25 कोटी, स्वातंत्र्यवीर सावरकर संशोधन केंद्रासाठी 25 कोटी, गरवारे स्टेडियम येथे हॉकी, बास्केटबॉलसाठी 50 कोटी, देवळाई सातारा येथे ड्रेनेजसाठी 32 कोटी तर गुंठेवारी भागातील ड्रेनेजसाठी दीडशे कोटी , नवीन रस्त्यासाठी तीनशे कोटी आदी विविध विकास प्रकल्पासाठी ७८२ कोटी ची मागणी कोटीची मागणी शासनाकडे केली असल्याची प्रशासक पाण्डेय यांनी सांगितले.

  गेल्या वर्षभरात पूर्ण झालेल्या विकास कामात चिकलठाणा व पडेगाव घनकचरा प्रक्रिया केंद्र, कांचनवाडी बायोगॅस प्रक्रिया केंद्र, शहरात शंभर कोटीचे विविध रस्ते, रस्ते, 650 सीसीटीव्ही कॅमेरे ,कंट्रोल रुम, गुंठेवारी विकास अधिनियम सुधारणा,, मुकुंदवाडी येथे एम एस आर टी सी कडून स्मार्ट सिटी बस डेपो, शहरात पहिला सायकल ट्रॅक, प्रायव्हेट हॉस्पिटल (सीसी सी, डीएससी, डीसीएचसी)डीईव्ही फाईन माफ, सिद्धार्थ गार्डन येथे जलतरण तलाव, सुपर हिरो गार्डन,महिला ५० व पुरुषांसाठी ५० पोर्टेबल टॉयलेट, विविध सार्वजनिक ठिकाणी spct Bing, स्मार्ट बस मध्ये तिकीट व मोबाईल ॲप, १५० बस निवारे, मासिक पास ई-पेमेंट आदि विकास कामे पूर्ण केली २५० कोटीचे रस्ते, १६८० कोटींची पाणी पुरवठा योजना व जंगल सफारी प्रकल्पाचे काम वगळता इतर पुढील कामे एका वर्षात पूर्ण होतील, असे प्रशासक पाण्डेय यांनी सांगितले.

  सदरील हाती घेण्यात आलेल्या विकास कामात दीडशे कोटी रुपयाचे रस्ते, संत एकनाथ ,संत तुकाराम नाट्यगृह ,क्रांती चौक येथील भव्य छत्रपती शिवाजी महाराज पूर्णकृती पुतळा ,स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक स्मृती उद्यान ,इ गव्हर्नन्स प्रकल्प, हर्सूल कचरा प्रक्रिया प्रकल्प,नेहरू भवन पुनर्विकास ,जंगल सफारी पार्क, ऐतिहासिक दरवाज्यांचे पुनर्विकास, ऐतिहासिक शहागंज क्लॉक टावर,गरवारे स्टेडियम विकास डीपीआर,खाम नदी पुनर्जीवन टप्पा 2 डीपीआर, एसटीपी पाणी शेतीसाठी वापरणे-वर्ल्ड बँक प्रोजेक्ट, हवेची गुणवत्ता साठवणे -कारंजे व्हर्टिकल गार्डन, धुळ मुक्त औरंगाबाद, इ गव्हर्नमेंट प्रकल्प, मेल्ट्रोन हॉस्पिटल ऑक्सीजन प्लांट, प्रदूषण कमी करण्यासाठी ई-व्हाईकल, स्मार्ट बसमध्ये प्रवासी माहिती प्रणाली, जीआयएस मॅपिंग, सर्व इन्फ्रास्ट्रक्चर फोर बटर प्लॅनिंग मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ औरंगाबाद सिटी, एक खिडकी प्रणाली आदी विविध प्रगतीपथावर आहेत.

  बैठकीला अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने, रविंद्र निकम, शहर अभियंता एस डी पानझडे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे, सहाय्यक संचालक नगर रचना जयंत खरवडकर, कार्यकारी अभियंता विद्युत ए..बी .देशमुख ,मुख्य लेखा अधिकारी संजय पवार, उपायुक्त अपर्णा थेटे , सिद्धार्थ उद्यान अधीक्षक विजय पाटील,मनपा जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद आदी उपस्थित होते.