जायकवाडी धरणातून ३ हजार ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरू

जायकवाडी धरणाच्या चार सांडव्यातून ३ हजार ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरू आहे. त्यामुळे आता धरणात ७ हजार घनफुट प्रतितास या वेगाने वरच्या धरणाचे पाणी दाखल होत आहे. परंतु पाण्याची पातळी पाहिली असता, ९८ टक्के कायम आहे.

 पैठण : जायकवाडी धरणात पावसाच्या पाण्यामुळे मोलाची वाढ झाली आहे. यामध्ये जायकवाडी धरणाच्या चार सांडव्यातून ३ हजार ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरू आहे. त्यामुळे आता धरणात ७ हजार घनफुट प्रतितास या वेगाने वरच्या धरणाचे पाणी दाखल होत आहे. परंतु पाण्याची पातळी पाहिली असता, ९८ टक्के कायम आहे.

धरणाचा विसर्ग बघण्यासाठी पर्यटकांनी धरण परिसरात गर्दी करू नये. यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धरणात पाण्याची आवक लक्षात घेता जायकवाडी पाटबंधारे विभागाने शनिवारी दुपारी दोन सांडवे वर करून गोदावरी नदीच्या पात्रात विसर्ग सुरू केला होता. त्यानंतर सांयकाळी पुन्हा दोन सांडवे उचलण्यात आले.

या दोन्ही सांडव्यातून एकुण २ हजार १०० आणि जायकवाडी जल विद्यूत केंद्रातून १ हजार ६०० असा एकुण ३ हजार ७०० क्युसेक पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडले जात असल्याने, गोदावरी काठोकाठ भरून वाहत आहे.