Don't name the city or the Aurangabad airport after Sambhaji Maharaj; Ramdas Athavale suggested a new name for the airport

औरंगाबाद : औरंगाबादच्या नामांतरावरुन राज्यातील राजकारण पेटले असताना रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील या वादात उडी घेतली आहे. औरंगाबादच्या विमानतळाला अजिंठा-वेरूळ लेण्यांचं नाव देण्याची मागणी आठवलेंनी केली आहे.
औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यावरून महाविकास आघाडीत मदभेत आहेत. मात्र, औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजाचं नाव देण्यावरून महाविकास आघाडीत एकमत आहे. तर, शहरालाच काय औरंगाबाद विमानतळालाही संभाजी महाराजाचं नाव देण्यास आठवलेंचा विरोध आहे.

आता त्यांनी विमानतळालाही संभाजी महाराजांचं नाव देऊ नये, असं म्हटलं आहे. ट्विट करत त्यांनी विमानतळासाठी नवीन नाव सुचवले आहे.

अजिंठा-वेरूळ या प्रसिद्ध लेण्या आहेत. त्या प्राचीन लेण्या असून जगातील आठवे आश्चर्य आहेत. शिवाय या लेण्या म्हणजे बौद्ध संस्कृतीच्या खाणाखुणा आहेत. त्यामुळे औरंगाबादच्या विमानतळाला या लेण्यांचं नाव द्यावं. संभाजी महाराजांच्या नावाला आमचा विरोध नाही. पण त्यांच्या नावाचा कोणीही राजकारणासाठी वापर करू नये, असं ट्विट आठवले यांनी केले आहे.