पेट्रोल डिझेल दरवाढीचा परिणाम; एसटीची पुन्हा भाडे वाढ

पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे एसटी महामंडळाला मालवाहतूक करण्यासाठी तिसऱ्यांदा दरवाढ करावी लागली आहे. एसटीने शंभर किलोमीटरच्या आत असलेल्या मालवाहतुकीच्या भाड्यात चार रूपयांची दरवाढ केली आहे.

    औरंगाबाद : पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे एसटी महामंडळाला मालवाहतूक करण्यासाठी तिसऱ्यांदा दरवाढ करावी लागली आहे. एसटीने शंभर किलोमीटरच्या आत असलेल्या मालवाहतुकीच्या भाड्यात चार रूपयांची दरवाढ केली आहे.

    प्रतिकिलोमीटर दर 46 रूपये झाला आहे. या दरवाढीचा फटका एसटीच्या मालवाहतुकीला सोसावा लागत आहे. लॉकडाउनमुळे एसटीतून प्रवासीसेवा बंद होती. यामुळे मालवाहतूक करण्यासाठी परिवहन विभागाने परवानगी दिली. यासाठी एसटीने जुन्या बस मालवाहतुकीसाठी तयार करून घेतल्या आहेत.

    ही सेवा सुरू झाल्यानंतर औरंगाबाद विभागाला मालवाहतुकीतून साधारणपणे 25 ते 30 लाखांपर्यंत उत्पन्न मिळत होते. सेवा सुरू करण्यात आली तेव्हा 100 किलोमीटरसाठी 38 रूपये प्रति किलोमीटर दर होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.