Energy Minister Dr Nitin Raut's warning to contractors who do not work on time

कंत्राटदार नागरिकांची कामे वेळेत करत नसल्याच्या तक्रारीत वारंवार वाढ होत आहे, अशा कंत्राटदारांची माहिती घेऊन त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले. रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या विनंतीनुसार पैठण विधानसभा मतदारसंघातील ऊर्जा विभागाच्या कामाची आज आढावा बैठक त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

    औरंगाबाद : कंत्राटदार नागरिकांची कामे वेळेत करत नसल्याच्या तक्रारीत वारंवार वाढ होत आहे, अशा कंत्राटदारांची माहिती घेऊन त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले. रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या विनंतीनुसार पैठण विधानसभा मतदारसंघातील ऊर्जा विभागाच्या कामाची आज आढावा बैठक त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

    पैठण तालुक्यातील दरकवाडी, औरंगपूरवाडी, रहाटगाव येथील ३३/११ के.व्ही.चे उपकेंद्र उभारण्याच्या मागणीच्या प्रस्तावाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी मंत्री संदिपान भुमरे यांना दिली.  पैठण तालुक्यातील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम त्वरित करण्यात यावे तसेच सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश डॉ.नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले.

    यावेळी प्रधान सचिव (ऊर्जा) दिनेश वाघमारे, महावितरणचे संचालक व संचलन संजय ताकसांडे हे प्रत्यक्ष तर औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]