प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

आंदोलनाच्या तयारीत असलेले मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक व स्वाभिमानी छावा मराठा संघटनेचे पदाधिकारी यांची रात्री पासून धरपकड करून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

    औरंगाबाद (Aurangabad) : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या (Marathwada Muktisangram Day) ध्वजारोहण दिनी (On the flag hoisting day) मराठा क्रांती ठोक मोर्चाने मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा इशारा दिला होता. यावरुन पोलिस प्रशासनाने खबरदारीची भूमिका घेत शहर व ग्रामीण भागातील मराठा समन्वयकांची (the Maratha coordinators) रात्री पासूनच धरपकड सुरू करुन त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मराठा समाजाच्या आरक्षणासह (reservation of the Maratha community) इतर प्रलंबित मागण्या राज्य सरकारने मान्य कराव्यात अशी मागणी सातत्याने मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

    मराठा समाजाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्‍यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा अडवून त्‍यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्‍याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने देण्यात आला होता.

    मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड
    आंदोलनाच्या तयारीत असलेले मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक व स्वाभिमानी छावा मराठा संघटनेचे पदाधिकारी यांची रात्री पासून धरपकड करून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक किरण काळे पाटील व कृष्णा पाटील उघडे यांना पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. भागवत नागरगोजे, राजू चव्हाण, राम मारकळ यांनी ताब्यात घेतले होते. तर बिडकीन येथे स्वाभिमानी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज पाटील मुरदारे, संतोष कुसेकर, दत्ता पाटील मोगल, विजय शेळके, आप्पासाहेब जाधव, अनिल कुटे, धनंजय चिरेकर, नारायण नरवडे, किशोर जाधव, गणेश जाधव हे सर्व पदाधिकारी सकाळी आठ वाजता वाहनातून झेंडे घेऊन औरंगाबादकडे आंदोलनाच्या तयारीत निघाले असतानाच बिडकीन पोलीस ठाण्याचे स.पो.नि.संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोरे, शिवानंद बनगे यांनी सर्व पदाधिकारी यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात हजर केले.

    मराठा आंदोलकांची घोषणाबाजी
    यावेळी बिडकीन येथिल निलजगा फाट्यावर मराठा आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदवला. मुख्यमंत्री ठाकरे हे औरंगाबाद शहरातील सर्व शासकीय दौरा आटोपून मुंबईला परत पोहोचल्यानंतर मराठा आंदोलकांना सोडण्यात आले असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.