महिला म्हणते, हा रस्ता ‘तिला’ छळतोय! रस्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची महिलेची मागणी

वाहतुकीसाठी आणि रहदारीसाठी सोयीस्कर वाटणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले की, तो प्रवाश्यांसाठी डोकेदुखी ठरतो; अशा वेळी खूप तर तुम्ही रस्ते बांधणारा ठेकेदार किंवा मनपा प्रशासनाच्या नावाने ओरड कराल; पण एका महिलेने एका निर्जीव रस्त्यावर तिचा आपल्याला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. हा रस्ता आपली अडवणूक करतोय, छळवणूक करतोय, असे तिचे म्हणणे आहे. यामुळे तिने चक्क निर्जीव रस्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. यामुळे पोलिसदादाही बुचकळ्यात पडले आहे? निर्जीव रस्त्याविरुद्ध गुन्हा दाखल तरी कसा करायचा?, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

औरंगाबाद (Aurangabad). वाहतुकीसाठी आणि रहदारीसाठी सोयीस्कर वाटणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले की, तो प्रवाश्यांसाठी डोकेदुखी ठरतो; अशा वेळी खूप तर तुम्ही रस्ते बांधणारा ठेकेदार किंवा मनपा प्रशासनाच्या नावाने ओरड कराल; पण एका महिलेने एका निर्जीव रस्त्यावर तिचा आपल्याला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. हा रस्ता आपली अडवणूक करतोय, छळवणूक करतोय, असे तिचे म्हणणे आहे. यामुळे तिने चक्क निर्जीव रस्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. यामुळे पोलिसदादाही बुचकळ्यात पडले आहे? निर्जीव रस्त्याविरुद्ध गुन्हा दाखल तरी कसा करायचा?, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

संध्या यांना याबाबत विचारले असता, ‘या रस्त्यामुळे अनेक प्रकारच्या वेदना रोज सहन कराव्या लागत आहे. आमच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी तक्रार दिली आहे. प्रशासनाने या बाबत संबंधितांवर कारवाई केली नाही तर न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचंही संध्या घोळवे-मुंडे यांनी सांगितले. औरंगाबादमध्ये (Aurangabad) चक्क एका रस्त्याविरोधात पोलीस तक्रार (police complaint)दाखल करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मानसिक, शारीरिक, आणि आर्थिक त्रास व्हावा म्हणून रस्ता माझी अडवणूक करत असल्याची तक्रार एका प्रयोगशाळा तंत्रज्ञ महिलेने पोलीस ठाण्यात केली आहे.

औरंगाबाद शहरात राहणाऱ्या संध्या घोळवे-मुंडे या फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करतात. गेल्या 14 वर्षांपासून त्या कार्यरत असून त्या रोज औरंगाबाद ते फुलंब्री असा अप-डाउन प्रवास करत असतात. पण, दररोज खराब रस्त्याचा सामना करावा लागत असल्यामुळे त्यांनी थेट औरंगाबाद-फुलंब्री या रस्त्या विरोधातच पोलिसात तक्रार केली आहे. हा रस्ता मला मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास व्हावा या हेतूने धक्काबुक्की व अडवणूक करीत आहे. हा रस्ता सुधारेल, त्याच्यामध्ये काही बदल होईल, अशी मला आशा होती. मात्र, तसे न होता हा रस्ता दिवसेंदिवस प्राणघातक बनत चालला. असल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.

तसंच, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, हा रस्ता मला वारंवार मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास देत आहे. त्यामुळे तो माझ्यावर कधीही हल्ला करू शकतो. त्यामुळे फुलंब्री ते औरंगाबाद या रस्त्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून मला न्याय द्यावा, अशी मागणीही तक्रारदार महिला संध्या घोळवे-मुंडे यांनी केली आहे.