uday samant

अंतिम वर्षात १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यापैकी ९० ते ९२ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेसाठी नोंद केली आहे. उरलेले विद्यार्थी आपल्या नजीकच्या केंद्रात ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा देणार आहे. त्यासाठी संपूर्ण यंत्रणाही सज्ज असल्याचं उदय सामंत म्हणाले.

औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या (Corona Virus) प्रादुर्भावामुळे विलंब झालेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे (Final Year Exam) निकाल १० ऑक्टोबरपासून लागण्यास सुरूवात होणार आहे. तसेच या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर कोव्हिडचा शेरा देण्यात येणार नाही. तसेच या परीक्षेत नापास (Fail) झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा एका महिन्यात घेतली जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली.

अंतिम वर्षात १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यापैकी ९० ते ९२ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेसाठी नोंद केली आहे. उरलेले विद्यार्थी आपल्या नजीकच्या केंद्रात ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा देणार आहे. त्यासाठी संपूर्ण यंत्रणाही सज्ज असल्याचं सामंत म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची काळजी घेणंही आवश्यक :

ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची काळजी घेणंही आवश्यक आहे. त्यामुळे सर्व विभागांनी एकत्र येऊन पोलीस विभागाला आणि महसूल विभागाला मदत करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं ते म्हणाले. या पदवीच्या प्रमाणपत्रांवर

हे पदवीचे प्रमाणपत्र हे गेल्यावर्षी प्रमाणेच :

कोव्हिड-१९ असा कोणत्याही प्रकारचा शेरा दिला जाणार नाही. हे पदवीचे प्रमाणपत्र हे गेल्यावर्षी प्रमाणेच दिलं जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मनात कोणाताही संभ्रम ठेवू नये. या प्रमाणपत्राचा आदर हा सर्व ठिकाणी पूर्वीप्रमाणे केला पाहिजे. या पदवीकडे जर कोणी बघत नसेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.