शेतकरी कुटुंबाला बांधावर बेदम मारहाण, 2 दिवस उलटूनही गुन्हा दाखल नाही…

बांधाच्या वादावरुन शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण झाल्याचा आरोप केला जात आहे. नारायण काळे आणि त्यांच्या कुटुंबाला बेदम मारहाण झाली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील हातनूर गावात ही घटना घडल्याची माहिती आहे. ठिबक सिंचनाचे पाईप उपसून कुटुंबावर फेकत मारहाण केले. पुरुषांसह महिलांनाही बेदम मारहाण केल्याचे कॅमेरात कैद झाले आहे.

    औरंगाबाद : शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण झाल्याची घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. पुरुषांसह महिलांनाही चोप देण्यात आला आहे. बांधाच्या वादातून ही हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    दरम्यान बांधाच्या वादावरुन शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण झाल्याचा आरोप केला जात आहे. नारायण काळे आणि त्यांच्या कुटुंबाला बेदम मारहाण झाली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील हातनूर गावात ही घटना घडल्याची माहिती आहे. ठिबक सिंचनाचे पाईप उपसून कुटुंबावर फेकत मारहाण केले. पुरुषांसह महिलांनाही बेदम मारहाण केल्याचे कॅमेरात कैद झाले आहे. काही जणांना फरपटत नेल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे.

    तसेचं मारहाण होऊन दोन दिवस उलटले तरी गुन्हा दाखल झालेला नाही. राजकीय दाबावातून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप पीडित शेतकरी कुटुंबाने केला आहे. औरंगाबादमधील कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.