asi head constable and home guard suspended in rape case nrvb

कंपनीत काम करत असताना मुलीची कंपनीतील एका तरुणासोबत मैत्री झाली. पण याचा सुगावा पीडितेच्या वडिलांना लागला. त्यानंतर 'तू माझी समाजात बदनामी केली', असं म्हणत बापानं मुलीला बेदम मारहाण(Father Beating To His Daughter) केली.

    औरंगाबाद : मुलीनं कंपनीतील एका सहकारी मुलासोबत मैत्री (Friendship with male Colleague) केल्याचा राग मनात धरून एका बापानं आपल्या मुलीचा छळ केल्याची घटना घडली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून पीडित मुलगी आपल्या वडिलांचा त्रास शांतपणे सहन करत होती. मात्र पीडित मुलीचा त्रास शेजारच्या महिलेला न बघवल्यानं तिनं घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर  धक्कादायक घटना समोर आली आहे.

    या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दामिनी पथक आणि सिडको पोलिसांनी संबंधित मुलीसह तिच्या आईची नराधम बापाच्या तावडीतून सुटका केली आहे.

    आरोपी बाप हा कंपनीतून सेवानिवृत्त झालेला आहे. तो आपली पत्नी आणि दोन मुलींसह टीव्ही सेंटर परिसरात राहतो. त्यांची मोठी मुलगी बी.कॉम उत्तीर्ण असून एका कंपनीत नोकरीला होती. कंपनीत काम करत असताना तिची कंपनीतील एका तरुणासोबत मैत्री झाली. पण याचा सुगावा पीडितेच्या वडिलांना लागला. त्यानंतर ‘तू माझी समाजात बदनामी केली’, असं म्हणत बापानं तिला बेदम मारहाण केली. यानंतर मुलीनं नोकरी सोडली. पण यानंतरही बापाचा रोष कमी झाला नाही. तो तिला सतत मारहाण करत राहिला. त्यानं अनेकदा पीडितेच्या हातावर कापूर जाळला. यामुळे तिच्या तळहाताला मोठी जखम देखील झाली आहे. त्याचबरोबर जेव्हा मनात येईल, तेव्हा बाप तिला संपूर्ण शरीरावर बेदम मारहाण करायचा यामध्ये पीडित मुलीचं अंग अक्षरशः काळं-निळं पडत होतं. नराधम बापाचा हाच दिनक्रम मागील बऱ्याच काळापासून सुरू होता. मुलीला होणारी मारहाण थांबवण्यासाठी आईनं मध्यस्थी केली, तर तो तिलाही मारहाण करायचा.

    बापाच्या सततच्या मारहाणीमुळे पीडित मुलीची मानसिक स्थिती देखील बिघडली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दाखल झालेल्या दामिनी पथकानं दोघींशी संवाद साधून तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे. पण अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. पीडित मायलेकींनी आता आपल्या गावाला जाण्याचा निर्णय घेतला आहे.