सासरच्या मंडळींनी दिला ‘या’ कारणासाठी त्रास, जाचाला कंटाळून पत्नीने-पतीला दिला तोंडी तलाक

दोघेही डॉक्टर पती-पत्नी हे लिंबेजळगावात राहून डॉक्टरांची सेवा करून उपजिविका भागवित होते. याच दरम्यान समिना यांना मुलगी झाली. मुलगी झाल्यामुळे सासरच्या मंडळीनी डॉ. समिना यांचा छळ सुरू केला. मुलगी झाल्याच्या कारणावरून समिना यांना शिवीगाळ, मारहाण तसंच शारिरीक आणि मानसिक त्रास दिला जात होता. हा वाद दिवसेंदिवस विकोपाला जात होता.

औरंगाबाद : मुस्लिम समाजातील (Muslim) तलाक पद्धतीला केंद्र सरकारने लगाम घातला असून सुद्धा कायद्याचे उल्लंघन होत असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यात लिंबेजळगावात उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या रुग्णासमोरच डॉक्टर पत्नीला तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी डॉक्टर पतीविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२०१७ मध्ये डॉ. जमिल शेख यांच्यासोबत डॉ. समिना यांचे लग्न झाले होते. समिना यांचं सासर हे सिल्लोडमधील खेडेगावात होतं. त्यामुळे त्या ठिकाणी समिना यांना आपला दवाखाना चालवणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी लिंबेगावाजवळ स्वखर्चाने भाडे भरून मुलीला आणि जावई जमिलला दवाखाना सुरू करून दिला होता. दोघेही डॉक्टर पती-पत्नी हे लिंबेजळगावात राहून डॉक्टरांची सेवा करून उपजिविका भागवित होते. याच दरम्यान समिना यांना मुलगी झाली. मुलगी झाल्यामुळे सासरच्या मंडळीनी डॉ. समिना यांचा छळ सुरू केला. मुलगी झाल्याच्या कारणावरून समिना यांना शिवीगाळ, मारहाण तसंच शारिरीक आणि मानसिक त्रास दिला जात होता. हा वाद दिवसेंदिवस विकोपाला जात होता.

२३ ऑक्टोबर रोजी डॉ. समिना या आपल्या रुग्णालयात काम करत होत्या. तेव्हा त्यांचे पती डॉ. जमिल यांच्यासोबत पुन्हा कुठल्या तरी कारणावरून वाद सुरू झाला. दोघांमध्ये रुग्णालयातच भांडण पेटले होते. भांडणात संतप्त झालेल्या जमिल यांनी रुग्णालयात एका रुग्णाचे उपचार सुरू असताना त्याच्यासमोरच डॉ.समिना यांनी तोंडी तलाक दिला.

तोंडी तलाक देणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे थेट वाळूज पोलीस स्टेशन गाठले आणि पती डॉ. जमिल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.