BJPs orange flag is fake Sanjay Rauts harsh criticism

एका राजकीय पक्षाच्या नेत्या असलेल्या ममता बॅनर्जी यांची तुलना पुण्यश्लोक राजमाता अहल्यादेवी होळकर यांच्याशी केल्याबद्दल खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा. अशी मागणी सकल धनगर समाजच्या वतीने पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास, शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचा इशाराही धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

    औरंगाबाद : एका राजकीय पक्षाच्या नेत्या असलेल्या ममता बॅनर्जी यांची तुलना पुण्यश्लोक राजमाता अहल्यादेवी होळकर यांच्याशी केल्याबद्दल खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा. अशी मागणी सकल धनगर समाजच्या वतीने पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास, शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचा इशाराही धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

    राऊत यांनी एका राजकीय पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांची तुलना पुण्यश्लोक आहल्याबाई होळकर यांच्याशी करून धनगर समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. संजय राऊत हे नेहमीच खोडकर भाष्य करून समाजाच्या भावना दुखावत असतात. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. जोपर्यंत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत धनगर समाज शांत बसणार नाही.

    तसेच लॉकडाऊन उघडण्याअगोदर गुन्हा दाखल न झाल्यास शिवसेना भवन वर मोर्चा काढू, असा इशारा सकल धनगर समाजाचे विभागीय अध्यक्ष अरुण रोडगे यांनी दिला आहे. राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने पोलिस आयुक्तालयात निवेदन देण्यात आले आहे.