प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

शहरात येणार्‍या पर्यटकांसाठी नववर्षात जानेवारी महिन्यापासून पाच हेरिटेज बस सुरू केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, या बस पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक पद्धतीच्या वातानुकूलित असतील. जानेवारी अखेरपर्यंत या बस शहरात दाखल होतील. इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी महापालिका औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची मदत घेणार आहे, अशी माहिती पालिकेचे प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी दि.18 दिली. शहरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी त्यासंबंधीचा मास्टर प्लान देखील तयार केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद (Aurangabad). शहरात येणार्‍या पर्यटकांसाठी नववर्षात जानेवारी महिन्यापासून पाच हेरिटेज बस सुरू केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, या बस पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक पद्धतीच्या वातानुकूलित असतील. जानेवारी अखेरपर्यंत या बस शहरात दाखल होतील. इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी महापालिका औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची मदत घेणार आहे, अशी माहिती पालिकेचे प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी दि.18 दिली. शहरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी त्यासंबंधीचा मास्टर प्लान देखील तयार केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पालिका आयुक्‍त पांडेय यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गुरूवारी दि.17 व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठक घेत औरंगाबाद शहराच्या पर्यटनासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर चर्चा केली. त्यात त्यांनी शहरातील पर्यटन विकासाबद्दल काही आदेश दिले. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार देखील उपस्थित होते. औरंगाबाद शहराच्या पर्यटन विकासाच्या संदर्भात मास्टर प्लान तयार करण्याची सूचना आदित्य ठाकरे यांनी केली. मास्टर प्लान तयार झाल्यावर त्यानुसार डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार केला जाईल. हा डीपीआर पर्यटन विभागाला सादर केला जाईल, असे पांडेय यांनी नमूद केले. डीपीआर तयार होतानाच शहरातील हिरेटेज रुट ठरवले जाणार असून शहरातील ऐतिहासिक वास्तू, वारसा स्थळे याचा त्यात समावेश असेल. तसेच औरंगाबादेत येणार्‍या पर्यटकांसाठी हेरिटेज बस सुरु करण्याची सूचना देखील आदित्य ठाकरे यांनी केल्याचे पांडेय यांनी स्पष्ट केले.

हेरिटेज बसमध्ये कुठेही बसा आणि उतरा !
शहरातील पर्यटन सवारीसाठी खरेदी केल्या जाणार्‍या इलेक्ट्रिक बस या प्रत्येकी 12 मीटर लांबींच्या असतील. प्रवाशांना बसचे तिकीट घेतल्यावर बसने प्रवास करताना बसमध्ये कुठूनही बसता येईल आणि कुठेही उतरता येईल. त्यामुळे पर्यटकांना ऐतिहासिक स्थळांवर पुरेसा वेळ देणे शक्य होईल. जानेवारी अखेरपर्यंत हेरिटेज बसेस शहरात धावतील, असे आयुक्‍त पांडेय यांनी सांगितले.