आमदार सतीश चव्हाण यांच्या आमदार निधीतून घाटीला मिळाली 28 लाख रुपयांची वैद्यकीय यंत्रसामुग्री

औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील (घाटी) कोविडग‘स्त रूग्णांकरिता वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मे महिन्यात रू.28 लाखाचा आमदार निधी दिला होता. या आमदार निधीतून खरेदी करण्यात आलेली यंत्रसामुग्री आ.सतीश चव्हाण यांच्या हस्ते आज  अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

    औरंगाबाद : औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील (घाटी) कोविडग‘स्त रूग्णांकरिता वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मे महिन्यात रू.28 लाखाचा आमदार निधी दिला होता. या आमदार निधीतून खरेदी करण्यात आलेली यंत्रसामुग्री आ.सतीश चव्हाण यांच्या हस्ते आज  अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

    कोवीड-19 विषाणुमुळे उद्‌भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंधक व नियंत्रण करण्यासाठी तसेच जिल्हास्तरावर परिणामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाही होण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने 16 एप्रिल 2021 रोजी वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी विधीमंडळ सदस्यांना सन 2021-22 या आर्थिक वर्षात रू. 1 कोटी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. आ.सतीश चव्हाण यांचा मतदारसंघ हा संपूर्ण मराठवाडा असल्याने कोवीड-19 च्या अनुषंगाने उपलब्ध करून दिलेला निधी त्यांनी मराठवाड्यातील विविध शासकीय रूग्णालयांना यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी दिला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास देण्यात आलेल्या 28 लाखाच्या निधीमधून 30 बायपॅप मशिन, 150 एनआयव्ही मास्क, 150 पेशंट सर्कीट आदी यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यात आली आहे. मागील वर्षी देखील आ.सतीश चव्हाण यांनी आमदार निधीतून घाटी रूग्णालयातील नवजात शिशु विभागात कोरोनाग्रस्त नवजात शिशु रूग्णांकरिता बेबी ट्रॉली, ट्रान्सपोर्ट इन्क्युबेटर, रेडीयंट वार्मर, पल्स ऑक्सीमीटर, सिरींग पंप, फोटो थेरपी, पोर्टेबल सक्शन, इन्फ्रा रेड थर्मामीटर, डिजिटल इन्फांट वेविंग स्केल, सेल्फ इन्फ्लेटिंग बॅग, लायरनगोस्कोप, ऑक्सिजन हूड आदी वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य उपलब्ध करून दिले होते.

    औरंगाबाद जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव कमी होत असून ही आनंदाची बाब आहे. माझ्या आमदार निधीतून घाटी रूग्णालयास देण्यात आलेल्या यंत्रसामुग्री व साहित्याचा कोविड बाधित रूग्णांवर उपचार करण्यास नक्कीच मदत होईल असे असे आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी सांगितले. सदरील यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिल्याबद्दल घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी आ.सतीश चव्हाण यांचे आभार मानले. यावेळी सुपर स्पेशालिटी ब्लॉकचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.सुधीर चौधरी, डॉ.एल.एस.देशमुख, अभिजीत देशमुख, नदीम शेख, अर्जुन जाधव आदींची उपस्थिती होती.

    औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या वैद्यकीय अध्यापकांना त्यांचे सेवानिवृत्तीविषयक लाभ मिळण्यास अडचणी येत असल्याचे अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी आ.सतीश चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावला जाईल असे आ.सतीश चव्हाण यांनी डॉ.कानन येळीकर यांना सांगितले. याप्रसंगी डॉ.सुधीर चौधरी, डॉ.एल.एस.देशमुख, डॉ.सिराज बेग, डॉ.विजय कल्याणकर आदींची उपस्थिती होती.