औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी ;‘माझी स्मार्ट बस’ च्या स्मार्ट सिटी अ‍ॅवॉर्डसाठी औरंगाबाद शॉर्टलिस्टेड

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडने (एएससीडीसीएल) कॅशलेस पेमेंट्ससाठी स्मार्ट कार्ड, वाहन ट्रॅकिंग सिस्टम (व्हीटीएस), प्रवासांना सवलतीच्या दरात प्रवाश अशा अनेक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह त्यात वाढ केली.

औरंगाबाद: शहरातील प्रवाशांच्या सोईसाठी सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी बसने अल्पवधीतच भरारी घेत कमी किंमतीमध्ये प्रवाशांना निश्चित स्थळी पोहचवून त्यांचा प्रवास सुखकर केला आहे. आतापर्यंतच्या वाटचालीची दखल झाली असून माझी स्मार्ट बसच्या दुसऱ्या टप्प्यातील इंडिया स्मार्ट सिटी अ‍ॅवॉर्ड्स कॉन्टेन्ट (आयएसएसी) २०२१ मध्ये स्मार्ट सिटी बसची निवड झाली आहे. औरंगाबादकरांसाठी ही गौरवास्पद बाब आहे.
नोव्हेंबर २०२० मध्ये कोविड १९ लॉकडाऊननंतर स्मार्ट सिटी बस नव्याने सुरू करण्यात आली. मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सुक्ष्म नियोजन करून स्मार्ट सिटी बसचा फायदा अधिकाधिक प्रवाशांना कशाप्रकारे होईल यासाठी पुढाकार घेतला. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडने (एएससीडीसीएल) कॅशलेस पेमेंट्ससाठी स्मार्ट कार्ड, वाहन ट्रॅकिंग सिस्टम (व्हीटीएस), प्रवासांना सवलतीच्या दरात प्रवाश अशा अनेक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह त्यात वाढ केली. त्याच्या मोबाइल अ‍ॅपमध्ये माहिती प्रणाली (पीआयएस), वेळेवर बससेवा (ईटीए), पोर्टलवर प्रवाश्यांची तक्रार, मार्गनिहाय टाइम टेबल आणि प्रवाशांना त्यांच्या बजेट अनुकूल भाडेसह साप्ताहिक, मासिक आणि त्रिकमासिक पासेस सुरू केले. प्रवाशांच्या सोईसाठी अत्याधुनिक बसथांबे उभारण्याचे काम हाती घेतले. नुकतचे १०० अत्याधुनिक बसस्थांबे बसविण्यात आले. मागील बसगाड्या आणि मार्गांव्यतिरिक्त, अतिरिक्त ५० बसगाड्या शहरातून २० नव्या मार्गांवर चालविल्या जात आहेत.  सर्व वेगळ्या सुविधांसह माझी स्मार्ट बस शहरातील सर्वात स्वस्त सार्वजनिक वाहतुकींपैकी एक आहे. शहरांना त्यांच्या प्रकल्प, अंमलबजावणी आणि नाविन्यपूर्ण कामगिरीबद्दल गौरव करण्यासाठी २५ आॅगस्ट २०२० रोजी इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड्स कॉन्टेस्ट (आयएसएसी) सुरू करण्यात आली. ‘माझी स्मार्ट बस’च्या स्मार्ट सिटी अ‍ॅवॉर्डसाठी औरंगाबाद शॉर्टलिस्टेड झाली आहे. औरंगाबादची माझी स्मार्ट बस ही भारतातील स्वस्त शहर बसेस म्हणून ओळखली जात असून पुरस्कारासाठी पात्र यादीत शॉर्टलिस्टेड ठरल्याने औरंगाबादकरांसाठी ही आनंदाची बाब आहे.