मराठवाड्याला मोठा दिलासा, जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले

औरंगाबादमधील जायकवाडी धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले आहेत. काल सोमवारी मुसळधार पाऊस झाल्यामुळे जायकवाडी धरणात पावसाच्या पाण्यामुळे मोलाची वाढ झाली आहे. शनिवारी ५ सप्टेंबर रोजी जायकवाडी धरणाच्या चार सांडव्यातून ३ हजार ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरू होता.

 पैठण : औरंगाबादमधील जायकवाडी धरणाचे १२ दरवाजे काल सोमवारी उघण्यात आल्यानंतर आज मंगळवारी पुन्हा एकदा ६ दरवाजे म्हणजे एकूण १८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. काल मुसळधार पाऊस झाल्यामुळे जायकवाडी धरणात पावसाच्या पाण्यामुळे मोलाची वाढ झाली आहे. शनिवारी ५ सप्टेंबर रोजी जायकवाडी धरणाच्या चार सांडव्यातून ३ हजार ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरू होता. त्यामुळे आता धरणात ७ हजार घनफुट प्रतितास या वेगाने वरच्या धरणाचे पाणी दाखल होत होते. परंतु पाण्याची पातळी पाहिली असता, ९८ टक्के कायम आहे.

जायकवाडी धरण तुडुंब भरलं असून यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे. जायकवाडी धरणातून औरंगाबाद, जालना शहर आणि २००हून अधिक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, लाखो हेक्टरवरील जमीन सिंचनाखाली येईल. जायकवाडीचे पाणी बीड-परभणी पर्यंत पाठवता येते.